Viral Video Sakal
Trending News

Viral : धक्कादायक! शेतातच इंजेक्शन टोचून वाढवले जातात भोपळे? Video पाहून धक्का बसेल

आपण खातो त्या भाज्यांत किती विष असतं?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या रोजच्या आहारात पालेभाज्यांचा सामावेश असतो. पण आपण खातो त्या पालेभाज्या, फळभाज्या, धान्ये, फळे यांमध्ये किती प्रमाणात रसायने असतात आपल्याला माहिती आहे का? काही पिकांवर मोठ्या प्रमाणावर किटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात भाज्यांत उतरत असते.

पण सध्या एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये घोसाळा (ज्याला काही भागांमध्ये भोपळा , गिलका असंही संबोधतात) या फळभाजीला शेतकऱ्यांकडून इंजेक्शन देण्यात येत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरो (NCIB) यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका शेतातील असून सदर फळभाजी वाढवण्यासाठी तीन व्यक्ती शेतातील प्रत्येक घोसाळ्याला इंजेक्शन देताना दिसत आहेत. व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने "हे इंजेक्शन का देतात" असं विचारल्यावर सदर व्यक्ती हे इंजेक्शन किड्यांना मारण्यासाठी देत असल्याचं सांगतात. पण थोड्या वेळाने घोसाळा ही फळभाजी मोठी करण्यासाठी इंजेक्शन देत असल्याचं सदर व्यक्ती मान्य करतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, आरोप करण्यात येत असलेला व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं असून घोसाळा या फळभाजीला मोठं करण्यासाठी कोणताच शेतकरी इंजेक्शन देत नाही. हा शेतकऱ्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

"शेतकऱ्याच्या वेषात लपलेले हे राक्षस आहेत. ज्यांना आपण अन्नदाता म्हणतो, ज्यांची पूजा करतो, त्यांच्यातच काही स्वार्थी लोकं आहेत. जे समान्यांच्या नसांत विष कालवत आहेत. सरकारने प्रत्येक गाव पातळीवर अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे." असं ट्वीट NCIB कडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT