Viral Zero-Waste Wedding: A Bengaluru Bride’s Eco-Friendly Celebration esakal
Trending News

Bengaluru Wedding : बंगळुरूच्या या जोडप्याने केला असा विवाह की चक्क निसर्गाने दिला आशीर्वाद; Zero Waste Weddingचा व्हिडीओ व्हायरल

Zero Waste Wedding Viral : पर्यावरणपूरक विवाह करून हे जोडपे बनले आहे सगळ्यांसाठी आदर्श,जगभरातून होतीये वाहवाही

Saisimran Ghashi

Eco-Friendly Wedding Video : विवाह हा भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र भाग मानला जातो.हल्ली लग्न बद्दलच्या अजब गजब गोष्टी आपण ऐकत असतो,पाहत असतो. अश्याच एका पर्यावरण पूरक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बंगळुरू मधील एका विवाह सोहळ्याचा आहे.

पर्यावरणाची काळजी घेणारी बेंगलोरची एक नवरी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. डॉ. पूर्वी भट यांनी आपल्या लग्नाला 'कचरामुक्त विवाह' बनवले. त्यांच्या या आयडियल विवाह सोहळ्याचा व्हिडियो इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला असून तब्बल ७ दशलक्ष लोकांनी तो पाहिला आहे.

डॉ. पूर्वी यांनी आपल्या लग्नाचा व्हिडियो बनवला असून त्यामध्ये त्या सांगतात, "माझ्या कुटुंबाच्या सहकार्यामुळेच 'कचरामुक्त विवाह' करण्याचे स्वप्न पूर्ण झाले." विवाह मंडप ऊसांपासून बनवले होते, तर जेवण केळीच्या पानांवर वाढले गेले. लग्नस्थळाची सजावट आंब्याच्या आणि नारळाच्या झाडाच्या पानांनी केली होती. या जोडप्याच्या वरमालेमध्ये फक्त फुले आणि सूती दोरे होते, त्यात कोणत्याही प्लास्टिकचा वापर नव्हता.

"समारंभानंतर तयार झालेला सर्व कचरा आमच्या शेतात खतात रूपांतरित केला गेला. आम्ही रिटर्न गिफ्ट्स जूटच्या पिशव्यांमध्ये दिल्या आणि हात धुण्याचे पाणी झाडांकडे वळवले गेले. आम्हाला आमच्या लग्नासोबतच पृथ्वीचेही स्वागत करायचे होते आणि मला अभिमान आहे की संध्याकाळी कार्यक्रम स्थळ अत्यंत स्वच्छ होते," असे त्या पुढे सांगतात.

त्यांनी या कचरामुक्त विवाहाचे नियोजन करण्यासाठी त्यांच्या आईचे कौतुकही केले. "माझी आई या सर्वामागची सुत्रधार होती. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आणि आम्ही ज्या पद्धतीने एक झालो त्यामुळे मला खूप समाधान आहे."

डॉ. भट यांचा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडिया युजर्सही रोमांचित झाले आहेत. आपल्याला फॅन्सी लग्नाचा प्लॅन किंवा मोठा बजेट असण्याची गरज नाही. आपल्याला फक्त प्रयत्न करण्याची आणि निसर्गाप्रती शक्य तेवढे करण्याची मनोधारणा असणे गरजेचे आहे. आशा आहे की यामुळे तुम्हाला असं पर्यावरणपूरक भन्नाट काहीतरी करण्याची कल्पना येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT