fact check on rohit sharma daughter viral video giving update about her father after ODI WC 2023 Final  Esakal
Trending News

Rohit Sharma : "एक महिन्याने हसेल!" वर्ल्डकप फायनल हरल्यानंतर रोहितच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल? जाणून घ्या सत्य

रोहित शर्माच्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

भारतात पार पडलेल्या वनडे क्रिकेट वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेट्सनी मात दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यानंतर देशभरातील क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला दिलेलं २४० धावांचं आव्हनाचा बचाव करू शकला नाही. कांगारूनी ४३ ओव्हरमध्ये अवघ्या चार विकेट्स गमावत हा सामना जिंकला.

भारताच्या या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले होते. या दोन्ही खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करून देखील भारतीय संघ विश्वविजेता बनू शकला नाही. यादरम्यान भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची मुलगी समायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ती रोहित शर्माबद्दल माहिती देताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये फॅन्स तिला रोहितबद्दल विचारतात तेव्हा ती म्हणते की तो त्याच्या खोलीत आहे. त्याला कोरोनाची लागण झाली आहे. तो जवळपास पॉझिटीव्ह आहे, पण एक महिन्यात तो पुन्हा हसू लागेल.

दरम्यान रोहित शर्मा याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ही व्हिडीओ क्लिप शेअर केली जात आहे. तसेच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहितबद्दल त्याच्या मुलीने अपडेट दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र सत्य काही दुसरेच आहे.

सत्य काय आहे?

हा व्हिडीओ दीड वर्षांपूर्वीचा आहे. हा व्हायरल व्हिडीओ जून २०२२ चा आहे. भारतीय संघ इंग्लड विरोधात त्यांच्याच देशातात पाचवी रिशेड्यूल्ड टेस्ट मॅच खेळत होता. तेव्हा कसोटी सामना सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली होती आणि त्याला संघातून बाहेर जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT