General Knowledge esakal
Trending News

GK : रस्त्यावर लागलेल्या रंगीत दगडांचा नेमका अर्थ काय? हे सीक्रेट कळल्यास कधीच चुकणार नाही रस्ता

हे रंग आणखी काही महत्वाची माहिती सूचित करतात आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

General Knowledge : तुम्ही रस्त्याने प्रवास करताना वेगवेगळ्या रंगाचे दगड कधी तरी बघितलेच असेल. यावर तुम्ही जात असलेल्या रस्त्यावरून पुढचं अतंर किती किलोमीटर आहे त्याचा अचूक आकडा लिहीलेला असतो. मात्र हे रंग आणखी काही महत्वाची माहिती सूचित करतात आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

माइलस्टोन प्रामुख्याने 4 वेगवेगळ्या रंगांचे असतात. यात एक दगड पूर्णपणे पांढरा आहे परंतु ते कोणत्याही श्रेणीमध्ये वर्गीकृत नाहीत. जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यकतेनुसार हे तयार केले जातात.

सर्वात सामान्यपणे दिसणारा दगड म्हणजे पिवळा. महामार्गावर तुम्हाला अनेकदा पिवळ्या रंगाचे टप्पे दिसतील. पिवळा रंग म्हणजे हा रस्ता केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असून तो NHAI ने बांधला आहे. त्याची देखरेखही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. हे महत्त्वाचे राष्ट्रीय रस्ते आहेत. जसे हायवे आणि एक्सप्रेसवे. भारतात ४ जानेवारी २०२३ पर्यंत १,४४,६३४ किमी लांबीचे नॅशनल हायवे नेटवर्क होते. मात्र यात सातत्याने बदल होत असतात.

General Knowledge

दुसरा रंग असतो हिरवा. तुम्हाला हे दगड रस्त्यात एका राज्यात राहताना दिसतील. हा रस्ता राज्य सरकारने केला आहे. त्याला राज्य महामार्ग म्हणतात. या रस्त्याच्या बांधकामापासून ते देखभालीपर्यंतचे काम राज्य सरकार करते. हे रस्ते एकाच राज्यातील अनेक शहरांना जोडतात. भारतातील राज्य महामार्गांची एकूण लांबी 1,86,908 आहे. राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे हा क्रमांकही बदलत राहतो. (National Highway)

तिसरा रंग गडद निळा किंवा काळा आहे. जर तुम्हाला रस्त्यावर हा दगड दिसला तर समजून घ्या की तुम्ही जिल्ह्याच्या मुख्य रस्त्यावर आहात किंवा तुम्ही शहराकडे जात आहात. हे जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करते. त्यांची लांबीही सुमारे ६ लाख किलोमीटर आहे. (Awareness)

चौथा मुख्य रंग नारंगी आहे. पांढऱ्या आणि केशरी रंगाचा दगड ग्रामीण रस्त्यांवर वापरला जातो. हे रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले असतात. ते एक गाव दुसऱ्या गावाला जोडण्याचे काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT