Video Sakal
Trending News

Video Viral : 12 दिवसांपासून उपाशी असलेल्या ठणठणीत मेंढ्या गोल गोल का फिरतायेत?

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या मेंढ्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या मेंढ्या गेल्या १२ दिवसांपासून गोल रिंगण करून फिरत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर काही मेंढ्या या रिंगणाच्या मध्यभागी उभ्या आहेत. या अजब व्हिडिओ चीन मधील असून हा प्रकार नेमका कसा घडतोय याची माहिती अजून समोर आलेली नाही. तर यावर संशोधन सुरू असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

(Goats Moving in Circle Viral Video)

हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक मेंढ्या काही अंतर सोडून गोल गोल फिरताना दिसत आहेत. तर हे पाहून अनेक लोकं हैराण झाले आहेत. चीनमधील मंगोलिया येथील हा व्हिडिओ असून पीपल्स डेली चीन या वृत्तसंस्थेच्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आलाय. तर या मेंढ्या अशा गोल का फिरतात याचं अधिकृत कारण समोर आलं नसल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, या मेंढ्यांनी १२ दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. १२ दिवसांपासून उपाशी असलेल्या या मेंढ्या अजूनही ठणठणीत आहेत आणि अशा अवस्थेत त्या गोल गोल फिरत आहेत. एक प्रकारचा हा चमत्कारंच असल्याचं बोललं जातंय. तर संशोधकांकडून या प्रकाराचा शोध सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुंबईत महापालिकेची सकाळपासून कारवाई सुरू; परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Ahilyanagar News: भीषण आगीत पाच दुकाने खाक ;पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी फाटा येथील घटना

IND vs NZ, 1st Test, Tea Break: बुमराह, आकाशदीप अन् कंबोजच्या धक्क्यांनंतर निकोल्स-फिलिप्सचा पलटवार! न्यूझीलंडचा डाव सावरला

Mahabaleshwar Tunnel Project : महाबळेश्वरमध्ये वांद्रे-वरळी सी-लिंकची झलक! 175 कोटींचा केबल-स्टे पूल पूर्ण; 'व्ह्यू गॅलरी'तून दिसणार कोयनेचा विहंगम नजारा

आई-वडिलांना राजीव गांधींबद्दल सांगण्याची भीती; सोनिया गांधींनी काय केलं? पुस्तकात सांगितला खासगी आयुष्यातील किस्सा

SCROLL FOR NEXT