Google Map Viral Video esakal
Trending News

Google Map Viral Video : गुगल मॅपने गंडवलं! भाजी घेऊन निघाला थेट जंगलात पोहचला, सिंह सुद्धा झाले शॉक

Google Map मुळे अडचणीत सापडल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्याचे आपण वाचल्या आहेत.

धनश्री भावसार-बगाडे

Google Map Funny Viral Video In Marathi :

Google Map अनेकदा आपल्याला एकतर खूप लांबच्या रस्त्याने नेतं किंवा नको तो शॉर्टकट दाखवत अवघड वाटेने घेऊन जाते. याचे अनेक उदारहणे, घटना आजवर घडल्याचे सोशल मीडियावर आपल्याला बघायला, वाचायला मिळाल्या आहेत.

कुठे ओडिसामध्ये वाहून गेलेल्या रस्त्यावर त्या Google Map ने पोहचवले तेव्हा बचाव यंत्रणेला बोलवून कार मधील चालकासह संपूर्ण कुटूंबाला वाचवण्याची घटना घडली तर कधी इथे रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा अशा वाटेने लोकांना प्रवास करावा लागला.

त्यामुळे हल्ली दिवसेंदिवस लोकांचा गुगल मॅप वरचा विश्वास उडू लागल्याचे चित्र दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर लोक एक भन्नाट कंमेंटही करत आहेत.

या व्हिडीओमध्ये सिंहांचा कळप जंगलात आपापल्या दिनश्चर्येत मग्न असताना तिथून एक गावकरी ताज्या भाज्या गाडीवरून घेऊन जाताना दिसतो. त्या माणसाला जंगलातून भर सिंहांच्या कळपा शेजारून जाताना सिंहही त्याच्याकडे आश्चर्याने बघताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर when you follow google map असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनमुळेच व्हिडीओ बघताना जास्त विनोदी वाटते. तसंच या व्हिडीओवर यूझर्सने कंमेंटही तेवढ्याच विनोदी टाकल्या आहेत.

कोणी म्हणतं, अफ्रिकन लोकांमध्ये एवढी हिम्मत येते कुठून, तर एकाने टाकलंय की, पूर्ण व्हिडीओत पुढे त्या माणसाला सिंहाने संपवले. कोणी त्यावर गुगल मॅपची अनाउंसमेंट टाकली आहे.

एकाने लिहिलं आहे की, त्या माणसाचा पराक्रम बघून सिंहालाही आश्चर्य वाटले. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, मी आता परत कागदी नकाशा वापरणार, गुगल मॅपने मला हरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहितसोबत 'डबल गेम'! BCCI ने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची केलीय सक्ती; मुंबई संघाने डावलले, संभाव्य यादीत नाव नाही

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषद

Indian Railway Ticket : रेल्वे तिकीटावरील GNWL, RLWL, PQWL म्हणजे काय? RAC तिकीट कन्फर्म असतं का? प्रवासापूर्वी नक्की जाणून घ्या!

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT