esakal
Trending News

Crime News : प्रेमाच्या त्रिकोणाचा ह्रदयद्रावक अंत! होणाऱ्या बायकोचा दुसऱ्या मुलावर जीव, लग्नाच्या एक दिवस आधी तरुणीनं डाव साधला अन्...

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये लग्नाच्या एक दिवस आधी वराचा अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आला. या घटनेमागे वधू आणि तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.

Saisimran Ghashi

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाचा लग्नाच्या एक दिवस आधी अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात वधू आणि तिच्या प्रियकरावर हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वर निहालचा मृतदेह जंगलात आढळला

ही घटना रामपूर जिल्ह्यातील गंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली. मोहल्ला गुजर टोला येथील रहिवासी मुशर्रत अली यांचा मुलगा निहाल (वय ३५) याचा विवाह धनुपुरा गावातील एका मुलीशी ठरला होता. रविवार, १५ जून रोजी वरात निघणार होती. मात्र त्याआधीच ही काळजाला हादरवणारी घटना घडली.

१४ जून रोजी दुपारी निहालला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला निहालचा चुलत भाऊ असल्याचे सांगून, "नवीन कपड्यांचा आकार देण्यासाठी थोडा वेळ घराबाहेर चल" असे म्हणत त्याला घराबाहेर बोलावले. निहालचा भाऊ नायब याने दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण दुचाकीवर आले आणि निहालला घेऊन गेले. त्यानंतर निहालचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

पोलिसांची तत्काळ कारवाई, एका आरोपीची कबुली

निहाल बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला. चौकशीदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अझीमनगर परिसरातील रतनपुरा येथील जंगलात शोधमोहीम राबवली. तिथेच निहालचा मृतदेह आढळून आला.

पोलीस सूत्रांनुसार, निहालचा गळा दाबून खून करण्यात आला असून, त्यानंतर पुरावा लपवण्यासाठी मृतदेह जंगलात फेकण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्रेमसंबंधातून हत्या?

कुटुंबीयांनी जो आरोप केला आहे तो अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वधूचा तिच्या प्रियकराशी पूर्वीपासून संबंध होता आणि निहालसोबत विवाह होऊ नये म्हणून प्रियकरासह तिनेच ही कटकारस्थान रचले. त्यांच्या मदतीला आणखी काही लोकही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गंज पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सीओ सिटी जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात एक आरोपी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. "हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून आम्ही संपूर्ण गंभीरतेने तपास करत आहोत. लवकरच सत्य जनतेसमोर येईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : भारतात एस-४०० पेक्षाही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली विकसित होणार...पंतप्रधान मोदींकडून ‘सुदर्शन चक्र मिशन’ची घोषणा

Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

Latest Marathi News Live Updates : जामनेरमधील तरुणाच्या हत्येची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी- एकनाथ खडसे

PM Modi's Independence Day 2025 Look: पांढरा कुर्ता अन् भगवा फेटा, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास लूकचे फोटो आले समोर

Independence Selfie Tips: स्वातंत्र्यदिनाला घरी, ऑफिसमध्ये तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? या स्पेशल टिप्समुळे तुमच्या सेल्फीवर होईल likes चा वर्षाव

SCROLL FOR NEXT