Viral Wedding Video: AI Recreates Speech of Best Man Who Passed Away esakal
Trending News

AI Wedding Speech : AIच्या मदतीने स्वर्गातील 'बेस्ट मॅन'ने दिला आशीर्वाद;वधूवरांच्या डोळ्यात आनंदाश्रू, तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल 'हा' हृद्यस्पर्शी व्हिडीओ

AI Speech Viral Video : ऑस्ट्रेलियातील लग्नसोहळ्यात घडली भावुक करणारी घटना,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Saisimran Ghashi

Artificial Intelligence : आता एआय आणि तंत्रज्ञानाचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपी होऊ लागली आहे. पण आजकालच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान हे दुःखातही सहारा बनू शकते हे एका भावुक करणाऱ्या लग्नसोहळातील व्हिडीओने सिद्ध केले आहे. या व्हिडीओमध्ये वधूवरांच्या लग्नसोहळ्यात 'बेस्ट मॅन'चा आवाजात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने स्पीच तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा 'बेस्ट मॅन' लग्नाच्या काही दिवस आधीच स्वर्गवासी झाला होता.

ऑस्ट्रेलियास्थित लग्नसोहळा आयोजित करणाऱ्या मॅनेजमेंट कंपनीने हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "वरच्या मित्राचा लग्नसोहळ्यात जेव्हा स्वर्गातील 'बेस्ट मॅन' स्पीच देतो." त्यापुढे म्हटले आहे, "AI चा यामध्ये वापर केल्यामुळे हे शक्य झाले."

व्हिडीओमध्ये सुरुवातीला वधूवरांना रिसेप्शनमध्ये बसलेले दाखवले जाते. थोड्याच वेळात एक आवाज ऐकू येऊ लागतो आणि शेवटी तो सर्वांना भावुक करून टाकतो.तो आवाज असतो या जोडप्याच्या स्वर्गवासी मित्राचा.

हा व्हिडीओ गेल्या महिन्यात पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला 6.6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या वाढतच आहे. या व्हिडीओला जवळपास 38,000 लाईक्सही मिळाले आहेत.

इन्स्टाग्राम वापरणारे या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही जणांनी याला खास तर काहींनी हृद्यस्पर्शी क्षण म्हटले आहे. तर काहींनी अश्रू अनावर झाल्याचेही म्हटले आहे.

तंत्रज्ञान जितके फायद्याचे तितकेच धोक्याचे असे म्हणले जाते. पण आता या च्यारलं व्हिडीओमुळे तंत्रज्ञान चांगल्या कामासाठी वापरल्यास त्याच्यातून कितीतरी चांगल्या गोष्टी निष्पन्न होऊ शकतात याची अनुभूती आली आहे.

या हृद्यस्पर्शी व्हिडीओवर तुमचे काय विचार आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT