Jharkhand child dies esakal
Trending News

Shocking News: द्यायचा होता बकऱ्याचा बळी पण गमवावा लागला चिमुकल्याला जीव...

धारदार शस्त्र अंगावर पडताच चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

सकाळ डिजिटल टीम

Jharkhand: झारखंडच्या गुमला जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गा पूजा चालू असताना नवमीच्या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जात होता. मात्र बकऱ्याला कापत असताना धारदार शस्त्र तुटून तीन वर्षाच्या चिमुकल्यावर जाऊन पडलं. धारदार शस्त्र अंगावर पडताच चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हृदयद्रावक घडनेने चिमुकल्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

तिसऱ्या बकऱ्याचा बळी देत असताना घडली घटना

अनेक वर्षांपासून गुमला या गावाक दुर्गा पूजा मंडपात बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे दोन बकऱ्यांचा बळी दिल्यानंतर तिसऱ्या बकऱ्याचा बळी देताना धारदार शस्त्र तुटून बकऱ्याच्या मानेवरून थेट मुलावर जाऊन आदळले. दिपक उराव असे या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. धारदार शस्त्र त्याला लागताच जखमी चिमुकल्याचा काही क्षणातच मृत्यू झाला होता.

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गावात चिमुकल्याविषयी हळहळ व्यक्त केली जातेय. तसेच हा तीन वर्षीय चिमुकला त्यांच्या कुटुंबियांचाही लाडका होता. त्यामुळे कुटुंबियांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT