Video Viral Sakal
Trending News

Video Viral : बसमध्ये महिलेची पर्स चोरायला चढला अन् दांडक्याने मार खाऊन परतला, घटना CCTV मध्ये कैद

मारल्यानतंर या चोरट्याला ड्रायव्हरने पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रवास करताना अनेकांसोबत चोरीचे प्रकार घडत असतात. अशा चोरीच्या प्रकरणामध्ये काही नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. चालू गाडीमध्ये मंगळसूत्र हिसकावून घेणे, पर्स हिसकावून घेणे, मोबाईल किंवा पैशांचे पाकीट चोरणे अशा घटना घडतात. पण कधीकधी चोर पकडला जातो आणि त्याला चांगलाच चोप दिला जातो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काही प्रवासी बसमध्ये चढत आहेत. या प्रवाशांमध्ये एक महिलासुद्धा आहे, तिच्या पाठीमागून एक व्यक्ती बसमध्ये चढतो आणि त्याच्यासोबत असलेला एक व्यक्ती बसच्या दरवाजा जवळ थांबलेला दिसत आहे. वर चढलेला व्यक्ती महिलेच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करतो पण महिला पर्स सोडत नाही आणि त्याचा प्लॅन फसतो.

दरम्यान, तो खाली पळणार तेवढ्यात ड्रायव्हर बसचा दरवाजा बंद करतो आणि दरवाजामध्ये चोरट्याचा हात अडकतो. त्यानंतर ड्रायव्हरने त्याला दांडक्याने चांगलाच चोप दिला आहे. खूप वेळ मारल्यानंतर पुढे एका सिग्नलला या चोरट्याला ड्रायव्हरने पोलिसांच्या ताब्यात दिले.

ज्या महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न या चोरट्याने केला होता त्या महिलेलासुद्धा पोलिसांनी खाली उतरवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही सर्व घटना ड्रायव्हरच्या डोक्याच्या वर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर प्रवास करत असताना आपणही अशा प्रकारे सावध राहिले पाहिजे. गर्दीचा फायदा घेऊन चोर चोरी करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT