A high-speed Mercedes crashes into the road divider

 

esakal

Trending News

Mercedes accident Video: भरधाव मर्सिडिज दुभाजकाला धडकून रॉकेटसारखी दोन कार वरून उडाली अन्...

High-speed Mercedes crash viral road incident : या भयानक अपघाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे; पाहणाऱ्यांना क्षणभर विश्वासच बसणार नाही.

Mayur Ratnaparkhe

High-Speed Mercedes Crash Detailed Report : रोमानियातील ओराडिया येथे एक अतिशय़ भयानक अपघात घडला. ही घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. यानंतर या अपघाचा व्हिडिओ समोर आला, परंतु हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना हे खरोखर घडलंय यावर विश्वासही बसत नाही. कारण, एक अतिशय भरधाव वेगाने जाणारी मर्सिडीज कार एका डिव्हायडरला धडकून  दोन कारवरून चक्क हवेसाराखे उडते व समोर जाऊन धडकते.

प्राप्त माहितीनुसार, प्रचंड वेगाने हवेत उडालेली कार खांबाला धडकून कार चक्काचूर झाली, परंतु तिचा चालक हा चमत्कारिकरित्या बचावला आहे. मात्र त्याला गंभीर दुखापत झालेली आहे. अपघात घडल्यानतंर घटनास्थळी उपस्थित नागरिकांना आणि पोलिसांनी मिळून त्याला, कारमधन कसेबसे बाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी सांगितले की ड्रायव्हरला गाडी चालवताना मधुमेहाचा झटका आला होता. त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण इतके कमी झाले की तो अचानक बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध अवस्थेत त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर तो चुकीच्या बाजूने एका चौकात घुसला आणि त्याची गाडी रॉकेटप्रमाणे उडाली.

याशिवाय, अपघातानंतर, पोलिसांनी ड्रायव्हरला दोषी ठरवले आहे व  त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ९० दिवसांसाठी रद्द केल आहे. तसेच त्याला मोठा आर्थिक दंडही  ठोठावण्यात आला. घटना घडली त्या ठिकाणी जवळच एक पेट्रोल पंप असल्याची माहिती आहे. सुदैवाने, कार पेट्रोल पंपाला धडकली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT