How a Dog Alerted the Entire Village in Mandi : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धरमपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या गावातील ६७ लोक सात दिवसांपासून एका मंदिरात राहत आहेत. ३० जूनच्या रात्री मुसळधार पाऊस पडत असताना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका कुटुंबाच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेला एक कुत्रा अचानक रडू लागला आणि जोरात भुंकू लागला.
कुटुंबातील सदस्यांनी उठून पाहिले तर घराला एक मोठी भेग पडली होती आणि त्यातून घरात पाणी भरू लागले होते. हे पाहून त्या कुटुंबाने तत्काळ कुत्र्याला घेऊन घर सोडले आणि आजूबाजूच्या लोकांनाही जागं केलं, त्यानंतर हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावत जाऊन पोहचले. यानंतर त्याच रात्री डोंगराचा एक महाकाय तुकडा तुटून त्या गावावर पडला आणि सर्व घरे त्यात गाडली गेली. मात्र सुदैवाने येथील ग्रामस्थ आधीच सुरक्षित ठिकाणी पोहचलेली होती.
हे सर्व त्या एका कुत्र्यामुळे झाले. कारण, जर कुत्रा जोरात भुंकला नसता आणि तिथल्या लोकांनी तो धोक्याचा इशारा वेळीच समजून घेत, शहाणपणाचे पाऊल उचलले नसते तर आज अनेक ग्रामस्थांचा मृत्यू झाला असता.
यावरून हे स्पष्ट होते की, प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची आधीच जाणीव होते. केवळ कुत्रेच नाही तर प्राणी, मासे, पक्षी आणि कीटक देखील सतर्क होतात आणि वेगळ्या पद्धतीने वागू लागतात. जी गोष्ट माणसांच्या लक्षात येणे गरजेचे असते.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपूर्वी, कुत्रे विचित्र पद्धतीने भुंकू लागतात, पक्ष्यांचा किलबिलाट देखील बदलतो आणि ते त्यांचे घरटे सोडून इकडे तिकडे उडू लागतात. तर साप आणि उंदीर यांना सर्वातआधी भूकंपाची किंवा इतर कोणत्याही ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची जाणीव होते, त्यानंतर कुत्र्यांनाही जाणीव होते आणि म्हणूनच ते मोठमोठ्याने भुंकू लागतात.
प्राण्यांना कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीची आगाऊ जाणीव होऊ शकते कारण ते पृथ्वीवरून येणाऱ्या लहरी आणि हालचाली ओळखतात. प्राण्यांमध्ये अशा संवेदना असतात ज्या माणसांपेक्षा खूप जास्त सक्रिय असतात. अशा परिस्थितीत, ते केवळ ऐकूच शकत नाहीत तर वातावरणाचा दाब आणि आर्द्रतेतील बदल देखील सहजपणे समजू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.