Himachal villagers' compassion goes viral as they carry a sick cow for treatment: हिमाचल प्रदेशमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर खरोखरच आपसूकच आपल्या तोंडून केवळ कौतुकास्पद असेच शब्द निघतील. या ठिकाणी एका जवळपास २०० किलो वजनाच्या आजारी गायीला दयाराम आणि लाल सिंह हे जिगरबाज दोघेजण आपल्या पाठीवर बांधून नेत असल्याचे दिसत आहे. शिवाय, अन्य ग्रामस्थही त्या दोघांना यामध्ये मदत करत आहेत.
या ग्रामस्थानी केलेल्या कृतीमुळे गाय ही खरोखरच आपली माता आहे, हे सिद्ध झालं आहे. तर त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना हिमाचलमधील सिरमौरचा दुर्गम भाग असणाऱ्या शिलाईच्या क्यारी गुंडाह पंचायतमधील आहे. हे ग्रामस्था एका आजारी गायीला उपचारासाठी नेत असल्याचे समोर आले आहे.
गाय आजारी असल्याने तिला चालणे शक्य नव्हते, आणि परिसरातील रस्त्यांची अत्यंत दरयनीय अवस्था झालेली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी गायीला पाठीवर बांधून नेण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनी मिळून हे कौतुकास्पद काम केल्याचं समोर आलं आहे. खरंतर ज्या दोघांन ही गाय आपल्या पाठीवर बांधली त्या दोघांच्या हिंमतीला विशेष दाद द्यावी लागेल, कारण एवढी वजनदार गाय पाठीवर उचलून आणि तेही प्रचंड डोंगराळभागाती खडकाळ रस्त्यावर नेणं हे महाकठीण काम होतं.
परंतु गायीला उपचारासाठी नेणं आवश्यक असल्याने त्या दोघांनी हिंमत दाखवली आणि त्याला ग्रामस्थांच्याही मदतीची जोड मिळाली. त्यांच्यागावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर जनावरांचा दवाखाना होता, परंतु पावसामुळे रस्ता पूर्णपणे खचलेला होता. वाहन तर सोडाच पण या रस्त्यावरून साधं पायी चालणं जिकरीचं होतं. अशावेळी आपल्या आजारी गायीला उपचार मिळावेत, म्हणून त्या दोघांनी अक्षरशा जीवाची बाजी लावल्याचं समोर आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.