Bageshwar dham baba mobile attack hindu ekta yatra viral video Bageshwar dham baba hindu ekta yatra viral video
Trending News

Viral Video : हिंदू एकता यात्रेत धीरेंद्र शास्त्रींवर हल्ला, चेहऱ्यावर फेकून मारला मोबाईल; पुढे काय झालं ? VIDEO व्हायरल

Hindu ekta yatra Bageshwar dham baba viral video : हिंदू एकता यात्रेदरम्यान धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वरधाम बाबा यांच्यावर कोणीतरी मोबाईल फेकला, जो थेट बाबांच्या गालावर जोरात लागला.

Saisimran Ghashi

Dhirendra shastri Trending Video : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू एकता यात्रेदरम्यान एक विचित्र घटना घडली. यात्रेदरम्यान कोणीतरी मोबाईल फेकला, जो थेट बाबांच्या गालावर जोरात लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

घटनेचा व्हिडिओ समोर

धीरेंद्र शास्त्री आपल्या भक्तांसोबत पायी प्रवास करत होते. हातात माईक घेऊन ते भक्तांशी संवाद साधत असतानाच कोणीतरी फुलांसोबत एक मोबाईल त्यांच्या दिशेने फेकला. हा मोबाईल थेट त्यांच्या गालावर लागला. या प्रसंगावर बोलताना त्यांनी सांगितले, "मोबाईल सापडला आहे, पण असे वागणे योग्य नाही."

यात्रेत मोठा जनसमुदाय

धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू एकता यात्रेचा आज सहावा दिवस होता. झाशीपासून ओरछा या मार्गावर सुरू असलेल्या या यात्रेत हजारो भक्त सहभागी झाले आहेत. ज्या मार्गांवरून यात्रा जात आहे, तेथे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात येत आहे.

यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि कुस्तीपटू द ग्रेट खली यांचा सहभाग. त्यांच्या उपस्थितीने यात्रेचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसेच भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, आमदार राजेश्वर शर्मा, आणि काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह यांसारख्या अनेक राजकीय नेत्यांनीही यात्रेला पाठिंबा दिला आहे.

हिंदू एकता यात्रेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "जातीच्या पाशातून बाहेर पडून हिंदूंनी एकत्र यायला हवे. जातीला अलविदा म्हणत सनातन धर्म मजबूत करण्यासाठी ही यात्रा आहे." त्यांच्या मते, सर्व हिंदू एकत्र येऊन भेदभाव दूर करणे हीच या यात्रेची खरी भावना आहे.

मोबाईल फेकण्यामागे नेमका कोणता हेतू होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतरही धीरेंद्र शास्त्री यांनी आपली यात्रा थांबवली नाही. त्यांच्या या शांत आणि संयमी भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे.

सुरक्षा व्यवस्था तपासली जाणार

या प्रकारामुळे यात्रा आयोजक आणि पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणी जोर धरत आहे.

बाबा बागेश्वर यांची हिंदू एकता यात्रा जातीय एकतेचा संदेश देत पुढे सरसावत आहे. मात्र, मोबाईल फेकण्याच्या या घटनेने यात्रेतील अनुशासन आणि सुरक्षिततेबाबत काही गंभीर प्रश्न उभे केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT