viral tweet sakal
Trending News

IAS Officer ची पोस्ट व्हायरल, "ऑफीसमध्ये कोणीही मित्र नसतो, काम करायचं पगार घ्यायचा अन्..."

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटर अकाउंटवर एक कोट शेअर केलयं.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक IAS Officer सक्रिय असतात. त्यांच्या अनेक मजेशीर आणि मन थक्क करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असतात. अशातच सध्या एका IAS Officer ची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलीय.

या पोस्टमध्ये त्यांनी ऑफीसमध्ये काम करणाऱ्या लोकांना सल्ला देणारा कोट शेअर केलाय. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतातील लाखो लोक ऑफीसला जात असतात आणि आपला संपूर्ण दिवस घालवतात. या दरम्यान काही कलीग लोक चांगले मित्र मैत्रीण बनतात तर काही लोक आपल्या कामाशी काम ठेवतात. काही लोकांना तर खूप चुकीचा अनुभव येतो ज्यामुळे त्यांना ऑफीसमध्ये एकटे राहणे आवडते.

या संदर्भात सोशल मीडियावर एक कोट खूप व्हायरल होतोय. हे कोट आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी ट्विटर अकाउंटवर शेयर केलंय. हे कोट शेयर करताना त्यांनी विचारलं की तुम्ही यावर सहमत आहात का?

IAS Officer अवनीश शरणने आपल्या ट्वीटवर एक इंग्रजी कोट शेयर केलाय. 'Not Everyone At Your Workplace Is Your Friend... Do Your Job, Get Paid... Go Home...' म्हणजेच 'तुमच्या ऑफीसमध्ये तुमचा कोणी मित्र नसतो. आपलं काम करा, पगार घ्या आणि घरी जा'

कोटची फोटो शेयर करताना तुम्ही याविषयी सहमत आहात का असे विचारले आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या कोटला सहमती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

८४ व्या वर्षीही आशा पारेख घेतात फिटनेसची काळजी! रात्रीच्या जेवणात असतं खास कॉम्बिनेशन

Taj Mahal: जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायला जाताय? सावधान! माकडांचा धुमाकूळ, पर्यटकांवर हल्ले

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT