Selfie 
Trending News

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण वाढत असल्याचं अर्जेंटिनातील एका अभ्यासातील निष्कर्षातून समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : डोक्यामध्ये उवा होण्याचं प्रमाण आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं आहे. याचं कारण काय असेल? याची तुम्हाला उत्सुकता असेलच पण कारण ऐकून तुम्हाला कदाचित धक्काही बसेल. कारण सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण वाढत असल्याचं अर्जेंटिनातील एका अभ्यासातील निष्कर्षातून समोर आलं आहे. या निष्कर्षानुसार डोक्यात उवा होण्याचं प्रमाणं हे तरुण-तरुणींमध्येच सर्वाधिक आहे. (In head lice outbreaks selfies may be surprising culprit found in study in Argentina)

डोक्यात उवा होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा एका उवा असलेल्या व्यक्तीचं डोक दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात उवा स्थलांतरीत होतात. याच पार्श्वभूमीवर जेव्हा सेल्फी घेण्यासाठी तरुण-तरुणी आपली डोकी जवळ घेऊन फोटो काढतात तेव्हा त्यांच्या डोक्यात अशा प्रकारे उवांची देवाण-घेवाण होते.

एकतर उवांना उडी मारता येत नाही किंवा त्या उडू शकत नाहीत. त्यामुळं दोन डोकी जवळ आली की उवांसाठी ही बाब फायद्याची ठरते, असं ब्यूनस आयर्समधील कीटक आणि कीटकनाशक संशोधन केंद्राचे संशोधक फेडेरिको गॅलासी यांनी केलेल्या एका अभ्यासातील निष्कर्षात असं म्हटलंय की, सेल्फी उवांच्या प्रसाराचा स्रोत म्हणून महत्वाचं काम करतात.

उवांचा प्रादुर्भाव खरंच वाढतोय का?

डोक्यातील उवांचा प्रादुर्भाव वाढत आहे की नाही हे निश्चितपणे स्पष्ट होत नाही. पण आत्तापर्यंतच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये डोक्यातील उवा काढण्याचे जे क्लिनिक आहेत त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.

उवा काढणारी कंपनी असलेल्या लायस क्लिनिक्सच्या वैद्यकीय संचालक क्रिस्टा लॉअर म्हणाल्या, देशभरात आम्ही उवा काढण्याच्या मागणीत वाढ झाल्याचं पाहिलं आहे. क्लिनिकमधील उपचारांमध्ये 18 टक्के वाढ आणि उवांमध्ये जवळपास 20 टक्के वाढ झाल्याचं यातून दिसून आलं आहे. एप्रिलमध्ये संपलेल्या 12 महिन्याच्या कालावधीत उवा काढण्याच्या उत्पादनांची मोठी विक्री झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT