Viral Video Sakal
Trending News

Inspirational Video : संकटांना कवटाळून बसू नका, इच्छाशक्ती ठेवा! एक पाय नसतानाही...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक संकटे येत असतात. काहीजण या संकटातून बाहेर पडतात तर काहीजण या संकटामध्ये अडकून पडतात. संकटामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहेत. पण कोणत्याही मोठ्या अडचणीतून सावरायचे असेल तर माणसाकडे धैर्य आणि इच्छाशक्ती असायला पाहिजे. सध्या असाच एक प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कारखान्यातील असल्याचं दिसत आहे. तिथे काही कामगार काम करताना दिसत आहेत. एका मोठ्या कंटेनरमध्ये ते कचरा उचलून टाकत असून एक पाय नसलेला व्यक्तीसुद्धा तिथे काम करत आहे. सदर व्यक्तीचा एक पाय तुटलेला असून त्याने नकली पाय बसवला आहे. तर त्या पायाच्या आधारे तो हे अवजड काम करताना दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "एक पाय नसतानाही हा व्यक्ती हे अवजड काम करू शकतो म्हणजे आपणही मोठ्या संकटातून सावरू शकत" अशा प्रेरणादायी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सोशल मीडियावरील अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune International Film Festival 2026 : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बाप्या’ने जिंकला सर्वोच्च मराठी चित्रपट पुरस्कार

Badlapur Child Abuse Case : बदलापूर संतापजनक घटनेने हादरलं! शाळेच्या बसमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर चालकाचा अत्याचार!

Amit Shah : गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहादत सोहळ्यासाठी अमित शाह नांदेडला येणार

Pune Crime : कोंढव्यात शस्त्राच्या धाकाने तरुणाला लुटले; मोबाईल, दागिने आणि रोख रक्कम लंपास

T20 World Cup 2026: भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचणार की नाही? विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT