Monsoon Session Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मंत्री धनंजय मुंडेंच्या खिशातला हात जयंत पाटलांनी नेमका पकडला अन् एकच हशा

दत्ता लवांडे

Monsoon Session : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे राज्य पातळीवर कृषी विभागाचा डॅशबोर्ड तयार करण्याच्या संदर्भात सभागृहात बोलत असताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुंडे यांचा हात खिशात असल्यावरून वक्तव्य केलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, राज्य पातळीवर कृषी विभागाचा डॅशबोर्ड तयार करायचा. त्याच्यावर सर्व लायसन्सधारी विक्रेते, कंपन्या, वितरक, उत्पादक हे असतील. यामुळे शेतकऱ्यांना एका क्लिकवर खते, औषधे आणि त्याच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती मिळेल असं ते सभागृहात सांगत असताना जयंत पाटील यांनी हरकत घेतली आणि "मंत्री महोदयांनी खिशातून हात काढावा" असं ते बोलले.

जयंत पाटलांच्या या हरकतीनंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. तर पाटलांनी हरकत ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, "हात काढल्याने उत्तर बदलणार नाही" असं जयंत पाटलांना म्हणाले.

उत्तर देताना काय म्हणाले धनंजय मुंडे?

"माझ्याकडे एवढं बारीक निरीक्षण आहे जयंत पाटील साहेबांचं, पण आणखीन त्यांनी थोडा वेळ निरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. एवढं बारीक निरीक्षण माझ्यावर आहे म्हणजे माझ्यात काहीतरी आहे" असा टोला धनंजय मुंडे यांनी मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT