viral Video
viral Video Sakal
Trending News

Viral Video : "झुमे जो पठाण..." गाण्यावर डान्स करून काकाने केलंय मार्केट जाम

सकाळ डिजिटल टीम

पठाण चित्रपट चांगलाच चर्चेत राहिलेला चित्रपट आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून तो चित्रपट वादात सापडला होता. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण सध्या "झूमे जो पठाण" या गाण्यावर डान्स करताना एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शिक्षकाचा असल्याची माहिती आहे. या शिक्षकाने पठाण चित्रपटावर बंदी घालण्यासाठी समर्थन केलं होतं पण नंतर चित्रपट पाहिल्यानंतर त्याला हा चित्रपट आवडला आणि तो शाहरूख खानचा चाहता झाला असं सांगण्यात येत आहे. पण त्याच्या डान्सने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

तो झूमे जो पठाण या गाण्याच्या संपूर्ण स्टेप्स आहे तशा करत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव दिसत नसल्यामुळे त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT