Viral Video Sakal
Trending News

Viral Video : दारूड्याला चावला विषय संपला; कोब्राच्याच तोंडातून फेस निघाला

सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या किंग कोब्राचे नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या किंग कोब्राचे नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. हा साप चावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कोब्रा चावलेल्या व्यक्तीचा नव्हे तर कोब्राचाच मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचे झाले असे की, एका दारूड्या व्यक्तीचा दोनदा चावा घेतला. मात्र, या घटनेत व्यक्तीचा मृत्यू होण्याऐवजी चावा घेणाऱ्या सापाचाच मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित व्यक्ती मृत किंग कोब्रा घेऊन रूग्णालयात पोहचला त्यामुळे तेथे उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले.

घटना नेमकी काय?

यूपीच्या कुशीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. किंग कोब्राचा मृतदेह घेऊन एक मद्यपी रूग्णालयाच्या आपतकालीन वॉर्डमध्ये पोहोचला. यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. या ठिकाणी संबंधित व्यक्तीने सदर कोब्राने आपल्याला दोनदा चावा घेतल्याचेही सांगितले. मात्र, यात आपण नाही तर, किंग कोब्राचाच मृत्यू झाला.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव डॉक्टरांनी दारूड्याला इंजेक्शन दिले. सध्या मृत कोब्राचा मृतदेह पिशवीत घेऊन रूग्णालयात दाखल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावार तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कश्यप मिमार नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT