Latur JCB Accident Viral Video Esakal
Trending News

Latur JCB Driver: मित्राशी भांडण झाले अन् 12 जणांना चिरडले! लातूरमध्ये जेसीबी चालकाचा धुडगूस, भीषण व्हिडिओ व्हायरल

Watch Video: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मद्यधुंद जेसीबी चालक रस्त्यावर धुडगूस घालताना दिसत आहे. लातूर शहरातील कान्हारी चौकात ही घटना घडली आहे.

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्रातील लातूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मद्यधुंद जेसीबी चालकाने रस्त्यावर घुडगूस घातल्याले पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये भरधाव वेगात जेसीबी चालवणाऱ्या चालकाने 10 ते 12 जणांना चिरडले. या घटनेत एका तरुणाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मद्यधुंद जेसीबी चालक रस्त्यावर धुडगूस घालताना दिसत आहे. लातूर शहरातील कान्हारी चौकात ही घटना घडली आहे.

मद्यधुंद जेसीबी चालकाने रस्त्यावरून चालणाऱ्या 10 ते 12 जणांना चिरडले आहे. या घटनेत मंडईत भाजी आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

जेसीबी चालकामुळे गोंधळ निर्माण झाल्यानंतर अनेक दुचाकीस्वारांनी मद्यधुंद जेसीबी चालकाचा पाठलाग करून त्याला पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जेसीबी चालकाचे त्याच्या मित्राशी भांडण झाले होते आणि त्यानंतर त्याने मद्यपान केले होते. सध्या पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे मद्यपान केल्यानंतर हिट अँड रनची आहेत. जुलैमध्ये पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान केल्यानंतर एका जोडप्याला उडवले होते. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईतही शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने मद्यपान केल्यानंतर एका दुचाकीला धडक दिली होती. ज्यामध्ये एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT