beer esakal
Trending News

Viral Video: सरकारी शाळेत दारु-कबाब पार्टी; व्हिडिओ व्हायरल अन् मुख्याध्यापक निलंबित

शिक्षकांनी नशेच्या धुंदीत ग्रामस्थांना मारहाणही केली.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : एका सरकारी शाळेत दारु आणि नॉनव्हेजची पार्टी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील मुख्याधापकानंच या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीचा व्हिडिओ व्हायरलं झाला आणि त्यानंतर या शिक्षकावर कारवाई झाली. शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानं संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. (Liquor Non Veg Party In MP Government School teacher Suspended after Video Viral)

सुत्रांच्या माहितीनुसार, इथल्या एका शासकीय प्राथमिक शाळेच्या परिसरात पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शाळेचे मुख्याध्यापक मनोहर सिंह बुंदेला ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता आपल्या काही सहकाऱ्यांसह एका खोलीत चिकन आणि कबाब शिजवत होते. जेव्हा ग्रामस्थांना या पार्टीबाबत कळलं तेव्हा ते या शाळेत पोहोचले आणि त्यांनी या घटनेचं चित्रिकरण केलं.

यावेळी दारुच्या नशेत धुंद झालेल्या या मुख्याध्यापकानं ग्रामस्थांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर ग्रामस्थांनी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ शिक्षणाधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं. काही ग्रामस्थांनी असाही आरोप केला की ही पार्टी करणारे शिक्षक नशेत होते आणि हा व्हिडिओ बनवताना त्यांनी काही लोकांना मारहाणही केली.

दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाला तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं आहे. शिक्षकाचं कृत्य सेवेच्या नियमांचं उल्लंघन करणारं असून याप्रकरणाची सविस्तर चौकशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Marital Physical Relations : लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवताना सावधान ! सुप्रीम कोर्टाने नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण, नेमकं काय म्हटलं ?

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गातून सत्ताधाऱ्यांना ५० हजार कोटींचा फायदा, महापुराच्या खाईत लोटणारा महामार्ग; राजू शेट्टींची टीका

Latest Marathi News Live Update : जीटी एक्सप्रेसच्या बोगीत लागली आग

Kolhapur Farmers : तंबाखूपासून कांद्याकडे वळले आणि नशीब पालटले; बहिरेवाडीचा कांदा बंगळूर बाजारपेठेत

Hasan Mushrif vs Chandrakant Patil : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT