Video Viral Sakal
Trending News

Video Viral : चिमुकलीनं दीड मिनिटात केलं रामायणाचं सुंदर वर्णन! ऐकून तुम्हीही प्रसन्न व्हाल

सकाळ डिजिटल टीम

लहान मुले निरागस असतात. त्यांचं मन शुद्ध आणि सुंदर असतं. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन निर्मळ असतो. त्यांना आपण एखादी गोष्ट सांगितली की, ती त्यांच्या डोक्यात फिट्ट बसते आणि ते त्याचं अनुकरण करू लागतात. सध्या असाच एका लहान चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर चिमुकलीने आपल्या गोड शब्दांमध्ये आईला रामायणाची स्टोरी अवघ्या दीड मिनिटांमध्ये ऐकवली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रसन्न व्हाल. राम जी, सीता माता आणि हनुमान जी माझे मित्र आहेत आहेत असं ती तिच्या शेजारी असलेल्या तिघांच्या बाहुल्यांकडे पाहून बोलत आहे.

"राम जी आणि सिता माता वनवासाला जातात तेव्हा रावण सिता माताला उचलून घेऊन जातात. त्यानंतर राम जी हनुमानाला सिता माताला घेऊन येण्यासाठी मदत मागतात आणि हनुमान जी लंकेत जाऊन सिता मातेला घेऊन येतात, लंकेला आग लावतात" अशा गोड शब्दांत ती आपल्या आईला रामायण ऐकवत आहे.

दरम्यान, या चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "रामायणाचं एवढं गोड वर्णन तुम्ही कुठं पाहिलं नसेल आणि ऐकलंही नसेल" असं कॅप्शन या व्हिडिओवर देण्यात आलं आहे. तर ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT