Look between Your Keyboard eSakal
Trending News

Look between.. Your Keyboard : तुमच्या कीबोर्डवर या अन् त्या अक्षरांच्या मध्ये पहा; सोशल मीडियावर कुठून आला हा ट्रेंड?

Trending Memes : सोशल मीडियावर सध्या असे मीम्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये यूजर्सना त्यांच्या कीबोर्डवरील अक्षरं पाहण्यास सांगण्यात येत आहे.

Sudesh

तुम्ही जर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल, तर Look Between H and L on your keyboard अशा प्रकारचा ट्रेंड तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अवघ्या एक ते दोन दिवसांमध्येच या ट्रेंडचे शेकडो मीम्स तयार झाले आहेत. मात्र, हा ट्रेंड नेमका कुठून सुरू झाला हे अगदी कमी लोकांना माहिती आहे.

काय आहे ट्रेंड?

सोशल मीडियावर सध्या असे मीम्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये यूजर्सना त्यांच्या कीबोर्डवरील अक्षरं पाहण्यास सांगण्यात येत आहे. यूजर्सना ठराविक दोन अक्षरांच्या मधली अक्षरं पाहण्यास सांगण्यात येतं. या अक्षरांमध्ये काही छुपा अर्थ असतो, ज्यामुळे तो संपूर्ण मीम समजतो. म्हणजेच कुणी H आणि L च्या मध्ये पाहण्यास सांगितलं, तर JK ही अक्षरं दिसतात. याचा अर्थ 'जस्ट किडिंग' असा होतो.

तीन वर्षे जुना ट्रेंड

खरंतर हा ट्रेंड आत्ताचा नाही, तर तीन वर्षे जुना आहे. 4Chan या इमेज बेस्ड वेबसाईटवर 2021 साली असा मीम पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. या मीमचा संबंध K-On या अ‍ॅनिमे सीरीजशी होता. यामध्ये आपल्या कीबोर्डच्या T आणि O या अक्षरांच्या मध्ये पाहण्यास सांगण्यात आलं होतं. या दोन अक्षरांच्या मध्ये YUI ही अक्षरं येतात. हे या सीरीजमधील एका कॅरेक्टरचं नाव होतं.

सोशल मीडियावर आता हा ट्रेंड परत एकदा व्हायरल होतो आहे. कित्येक मोठमोठे ब्रँड्स देखील अशा प्रकारच्या पोस्ट करत आहेत. यामुळे हा मीम ट्रेंड अगदी वेगाने लोकप्रिय झाला आहे. अगदी दिल्ली पोलिसांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स या एक्स हँडलवरुन देखील अशा प्रकारची पोस्ट करण्यात आली आहे. सोशल मीडियावर कित्येक यूजर्स दोन-तीन दिवसांमध्येच या ट्रेंडला वैतागले देखील आहेत. हा ट्रेंड बास करा, आताच वैताग आला अशा आशयाच्या कित्येक पोस्ट देखील एक्स आणि इन्स्टाग्रामवर पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

Sports Tournament in 2026: क्रिकेट ते फुटबॉल वर्ल्ड कप... २०२६ मध्ये क्रीडा स्पर्धांची सर्वात मोठी पर्वणी; 'या' तारखा नोट करून ठेवा

आता गणिताची कोडी सोडवणार अयोध्येचे 'राम मंदिर'; उत्तर प्रदेशातील इयत्ता चौथीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT