Trending News Sakal
Trending News

Trending News : लाखो खर्च करून बसवले खोटे दात; सुंदर दिसण्याच्या नादात शार्कसारखा दिसू लागला तरुण

जॅकने सांगितलं की, हे अगदी एखाद्या हॉरर फिल्मसारखं आहे. मला असं वाटतंय की सगळे दात काढून टाकावेत.

वैष्णवी कारंजकर

ठेविले अनंत तैसेची रहावे, हे तर तुम्ही ऐकलं असेलच. पण तरीही अनेक लोक जास्त सुंदर दिसण्याच्या मोहापायी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल करत राहतात. काही वेळा हे बदल फसतात आणि काहीतरी विचित्रच होऊन बसतं. नुकतंच एका व्यक्तीने दातांची ट्रीटमेंट घेतली आणि आता त्याच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे. त्याने आपला अनुभव सांगितला आहे.

जॅक जेम्स नावाच्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यावर चांगलं दिसण्यासाठी खोटे दात बसवले होते. त्यासाठी तो ब्रिटनवरुन तुर्कीला आला. त्याने जवळपास ३ लाख रुपये खर्च करून खोटे दात बसवले. सुरुवातीला तर जॅकला आपले दात आवडले होते पण काही दिवसांतच त्याच्या दातांतून रक्त येऊ लागलं आणि तोंडाचा वासही येऊ लागला. त्यामुळे गोंधळलेला जॅक डेंटिस्टकडे गेला.(Trending News)

डेंटिस्टने तपासणी केली आणि त्यानंतर सांगितलं की दातांची अवस्था प्रचंड वाईट झाली आहे. मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झालं आहे आणि ते ठीक करण्यासाठी जवळपास २० लाख रुपये खर्च येईल. इंग्लंडमध्ये या ट्रीटमेंटला एवढा खर्च येणार म्हटल्यावर जॅक पुन्हा आपल्या तुर्कीतल्या डेंटिस्टकडे गेला. इथे जॅकला सांगितलं की डेंटिस्टची यात काही चूक नाही. दात व्यवस्थित करायचे असतील, तर तेवढा खर्च करावाच लागेल.

आता इतर कोणता पर्याय नसल्याने जॅकला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागलं. उपचारादरम्यान त्याला नकली दात काढावे लागले आणि इन्फेक्शन ठीक करावं लागलं. आता त्याला तात्पुरते दात बसवले आहेत. यानंतर जॅकला वाटलं की आता सगळं ठीक झालं. पण एकदा दात घासत असताना जॅकच्या दातांवरचं खोटं आवरण निघालं. त्याने पाहिलं की त्याचे खरे दात आता शार्कप्रमाणे झाले आहेत आणि त्यामध्ये फटीही आल्या आहेत.

जॅकने सांगितलं की, हे अगदी एखाद्या हॉरर फिल्मसारखं आहे. मला असं वाटतंय की सगळे दात काढून टाकावेत. जॅक आता आणखी एखादा डेंटिस्ट शोधत आहे. शरीरातले कृत्रिम बदल फसल्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही. भारतातही अशी अनेक उदाहरणे आहेत.

अनेक अभिनेत्रीही आपल्या ओठांची, स्तनांची सर्जरी करतात. सर्जरी फसल्याची अनेक उदाहरणे तुम्हीही ऐकली पाहिली असतील. सर्जरीमुळे चेहरा विद्रूप होणे, शरीर बेढब दिसणे किंवा रक्तस्त्राव होणे असे अनेक साईड इफेक्ट्स होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT