man selling milk on harley davidson bike watch viral video Boodhwala on harley davidson video  
Trending News

Viral Video : शेतकरी जोमात, पाहाणारे कोमात; हार्ले डेव्हिडसनवर घालतो रतीबाचे दूध!

सकाळ डिजिटल टीम

भल्या सकाळ दूधवाले मोटारसायकलवर कंटेनर भरून दूध पुरवठा करण्यासाठी बाहेर पडतात. त्याच्याकडे असलेली बाईक एकतर स्प्लेंडर असते नाहीतर बजाज. तसे, पूर्वी दूधवाले 'राजदूत' मोटारसायकलवरही दूध घेऊन जाताना दिसायचे. पण तुम्ही 'हार्ले डेव्हिडसन' वर दूध देणार्‍याला कधी पाहिले आहे का? पाहिला नसेल...तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये एक व्यक्ती 'हार्ले डेव्हिडसन' या लक्झरी बाईकवर दुधाचे अवजड कंटेनर लटकवून ग्राहकांना दूध वाटप करताना दिसत आहे. इतकेच नाही तर त्याच्या बाईकच्या नंबर प्लेटच्या ऐवजी इंग्रजीत 'गुर्जर' असे लिहिले आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये एक व्यक्ती 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवर दुधाचे कॅन घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ही लक्झरी बाईक विकत घेण्यापूर्वी सामान्य लोक 10 वेळा विचार करतात. हा मात्र थाटात दुध विकायला हार्ले डेव्हिडसन बाईक वापरतो आहे. अनेकांच स्वप्न असलेल्या या आलिशान दुचाकीला दोन मोठे कॅन बांधून हा माणूस दूध विकतोय.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

ही व्हिडीओ क्लिप इंस्टाग्राम वापरकर्ता amit_bhadana_3000 याने 18 डिसेंबर रोजी पोस्ट केली होती. ज्याला दोन लाखांच्या जवळपास लाईक्स आणि 30 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट्स केल्या. यावर अनेकजण या व्हिडीओवर मजेशिर कमेंट्स करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाने Playing XI मध्ये काय करावा बदल? पाँटिंग, शास्त्रींनी 'त्या' एका खेळाडूचं नाव घेत स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ, सिमकार्ड, पॉवर बँक, चार्जर आणि वायर जप्त

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

SCROLL FOR NEXT