Modi Viral Video sakal
Trending News

Modi Viral Video : चायवाला नाही तर चाटवाला! मोदी विकतात पाणीपुरी? व्हिडीओ पहाच

तुम्हाला वाटेल देशाचे पतंप्रधान पाणी पुरी कसे काय विकताहेत? मात्र जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

Modi Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे व्हिडीओ असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी पाणीपुरी विकताना दिसताहेत.

तुम्हाला वाटेल देशाचे पतंप्रधान पाणी पुरी कसे काय विकताहेत? मात्र जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल. आज आपण या व्हिडीओ मागील स्टोरी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Modi Viral Video a man look like pm narendra modi buy panipuri at Anand Gujarat)

व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्याला सुरवातीला नरेंद्र मोदी पाणी पुरी विकत आहेत, असं वाटतं मात्र नंतर आपल्याला असं लक्षात येईल की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर त्यांच्या सारखे दिसणारे गृहस्थ आहे. यांचा लूक हूबेहूब नरेंद्र मोदी यांच्यासारखा आहे त्यामुळे ते विशेष चर्चेत आहे.

कोण आहेत हे गृहस्थ?

मोदींसारखे दिसणाऱ्या या गृहस्थाचं नाव अनिलभाई ठक्कर आहे. त्यांच्या शॉपचं नाव तुलसी पाणीपूरी असून गुजरातच्या वल्लभ विद्यानगर, आनंद येथे ते पाणी पुरी विकतात. अनिलभाई ठक्कर वयाच्या पंधराव्या वर्षापासून पाणीपूरीचा व्यवसाय करतात.

त्यांचा गेटअप आणि साइड फेस मोदींसारखा असतो म्हणतो, म्हणून लोक त्यांना मोदी म्हणून हाक मारतात. अनिलभाई म्हणतात, मोदी हे चहावाले होते तर मी पाणीपुरीवाला आहे. ते पाच पदार्थांचा व्यवसाय करतात त्यात पाणीपूरी, भेलपूरी, शेवपूरी, दहीपूरी आणि बास्केट चाटचा समावेश आहे.

विशेष म्हणजे अनिलभाई पाणीपूरी सर्व्ह करताना पाणी वेगळ्या कपमध्ये देतात. त्यांच्यामते लोकांनी पाणीपूरीचा आस्वाद घेणे तितकेच गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT