Viral Video Sakal
Trending News

Viral Video : जगातील सर्वांत भारी रेस्क्यू; माकडाने वाचवला मांजराचा जीव

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण प्राण्यांमध्ये माणुसकी आजही आपल्याला पाहायला मिळते.

प्राणी कधीच आपल्यावर केलेले उपकार विसरत नसतात. याची प्रचिती सध्या एका व्हिडिओतून आली आहे. एका माकडाचा आणि पाळीव मांजराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर पाण्याच्या रिकाम्या टाकीत पडल्याचं आपल्याला दिसत आहे. तर माकड त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माकड टाकीत उतरून मांजराला वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मांजर घाबरून टाकीत बसलेलं दिसत आहे. त्यानंतर एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने माकड मांजराला वर काढते.

दरम्यान, मांजराला वर काढल्यानंतर माकड त्याला कुरवाळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ फेसबुकवर अनेकांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Latest Marathi News Live Update : नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू नियुक्ती पुन्हा लांबणीवर, बैठक अचानक स्थगित

Aryaman Birla: आयपीएल खेळाडू ते संघाची मालकी; रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे संचालक आर्यमन बिर्ला यांचा प्रवास

Tamannaah Bhatia And Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रा तमन्ना भाटिया पुन्हा एकत्र, ‘व्वन’ चित्रपट २८ ऑगस्टला भेटीला!

Surgery Controversy: उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!

SCROLL FOR NEXT