Mouse in vessel 
Trending News

Viral Video: कँटिनमध्ये चटणीच्या मोठ्या भांड्यात पोहतोय उंदीर, या कॉलेजमधला किळसवाणा Video Viral

Mouse swimming inside a large vessel Viral Video: कॉलेज प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली आहे. कॉलेज कँटिगचे कॉन्ट्रेक्ट दिलेल्या कंपनीला यासाठी जबाबदार धरले जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

कार्तिक पुजारी

हैदराबाद- अत्यंत किळसवाणा असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदराबादमधील एका कॉलेजच्या कँटिगमध्ये चटणीच्या एका मोठ्या भांड्यामध्ये अक्षरश: एक उंदीर पोहोत होता. जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी हैदराबाद सुल्तानपूरमधील (JNTUH) कॉलेजमधील हा व्हिडिओ आहे.

लक्ष्मीकांत यांनी एक्सवर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. कॉलेज प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली आहे. कॉलेज कँटिगचे कॉन्ट्रेक्ट दिलेल्या कंपनीला यासाठी जबाबदार धरले जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कॉलेजच्या मेसची तपासणी प्रिन्सिपालकडून केली जात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांचे पालक काळजीत पडले आहेत. त्यांनी कॉलेज प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली आहे. विद्यार्थी आजारी पडत आहेत. आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आहे, असं पालकांनी म्हटलं. पालकांनी कॉलेजबाहेर आंदोलनाची तयारी केली आहे.

विशेष म्हणजे JNTUH कॅम्पसमध्ये अशाप्रकारची ही पहिली घटना नाही. २८ जून रोजी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॉलेजमध्ये धाड टाकली होती. यावेळी त्यांना प्लेट खराब आढळल्या होत्या. बुरशी आलेल्या भाज्या वापरल्या जात होत्या. उंदीर इकडेतिकडे फिरत होते. संपूर्ण किचन घाण होते. असे असताना कॉलेज प्रशासनाकडून याप्रकरणी कोणतीही काळजी न घेतल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT