Video Viral Sakal
Trending News

No Confidence Motion : खासदार श्रीकांत शिंदेंनी संसदेत केलं हनुमान चालिसाचं पठण; विरोधकांना उत्तर | Video Viral

विरोधकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी थेट हनुमान चालिसाचं पठण केलं आहे.

दत्ता लवांडे

दिल्ली : कल्याण येथील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आज संसदेत थेट हनुमान चालिसाचे पठण केले आहे. विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव मांडल्यानंतर ते महाराष्ट्रातील सत्ताकारणावर बोलत होते. यावेळी त्यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित केला आणि मला हनुमान चालिसा पाठ असल्याचं सांगत थेट पठणाला सुरूवात केली.

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे सभागृहात बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपसोबत निवडून आली आणि काँग्रेससोबत युती केली. त्यांनी १३ कोटी लोकांसोबत गद्दारी केली, हे आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी परत भाजपसोबत सरकार स्थापन केलं."

"महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हनुमान चालिसा पठण करण्यासाठीसुद्धा परवानगी दिली जात नव्हती." असं ते बोलत असताना विरोधकांच्या बाकावर बसलेल्या कुणीतरी आवाज केला आणि शिंदे यांनी, 'मला हनुमान चालिसा पूर्ण येते' असं म्हणत हनुमान चालिसा पठणाला सुरूवात केली.

दरम्यान, इंडिया आघाडीने मणिपूर प्रश्नावर बोलण्यासाठी आणि सरकारला घेरण्यासाठी संसदीय अधिवेशनामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. लोकसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्विकारल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरूवात केली. तर भाजपच्या नेत्यांनीसुद्धा काँग्रेसला चांगलं प्रत्युत्तर दिलं.

मणिपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलं आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. "मोदी सत्तेत आल्यानंतरच मणिपूरचा चांगला विकास झाला आहे. काँग्रेसच्या काळात कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही" असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत बोलताना केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT