Digital Beggar Mumbai eSakal
Trending News

Digital Beggar : सुट्टे पैसे नको, QR स्कॅन करा; मुंबईतील 'डिजिटल' भिकाऱ्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

देशातील भिकारी देखील यूपीआयच्या माध्यमातून पैसे मागताना दिसून येत आहेत.

Sudesh

गेल्या काही वर्षांमध्ये देशात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. अगदी रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्यांपासून, मोठ्या कारच्या शोरूमपर्यंत सगळीकडे लोक यूपीआयच्या माध्यमातून पैसे देत आहेत. या सगळ्यात चक्क देशातील भिकारी देखील यूपीआयच्या माध्यमातून पैसे मागताना दिसून येत आहेत.

मुंबईतील अशाच एका डिजिटल भिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकलमध्ये फिरत, हातात एक बारकोड घेऊन हा व्यक्ती भीक मागताना दिसत आहे. यामुळे लोक आता 'सुट्टे पैसे नाहीत', असं म्हणून त्याला टाळूही शकत नाहीयेत.

रेल्वेमधील प्रवासी या भिकाऱ्याला पाहून हसत आहेत. कित्येक जण त्याला टाळत आहेत, तर काही अगदी कौतुकाने क्यूआर कोड स्कॅन करून त्याला पैसे देत आहेत.

एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जग्गीराम रणबीर असं या ट्विटर यूजरचं नाव आहे. डिजिटल इंडिया अशा हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर होत आहे. डिजिटल पेमेंट वापरण्याची ही हाईट असल्याचं जग्गीरामने म्हटलं आहे. ही कॅशलेस सुविधा एकदम भारी असल्याचं या यूजरने म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिव्यांग नसून देखील काम करायचं सोडून भीक मागत असल्याबद्दल या भिकाऱ्यावर काही जण टीका करत आहेत. तर, त्याच्या या डिजिटल आयडियासाठी काही लोक त्याचं कौतुकही करत आहेत. याला सरकारचं यश म्हणावं की अपयश? असा प्रश्नही एका ट्विटर यूजरने उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT