Mumbai Trans Harbour Link esakal
Trending News

Mumbai Trans Harbour Link : मुंबईच्या सागरी सेतूचा खर्च कोट्यावधीत, पारबंदर प्रकल्पाची वैशिष्ट्ये वाचा

कोट्यावधींचा खर्च लागणाऱ्या या सेतूचा नक्की फायदा कोणाला आणि कसा ते थोडक्यात समजून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Trans Harbour Link : मुंबईतील एमटीएचएल प्रकल्प हा मुंबईत आर्थिक भरभराट आणणारा ठरेल तसेच यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतरसुद्धा फार सोपे होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र कोट्यावधींचा खर्च लागणाऱ्या या सेतूचा नक्की फायदा कोणाला आणि कसा ते थोडक्यात समजून घेऊया.

हा प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. हा पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई -गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)

आता या प्रकल्पाचे फायदे थोडक्यात समजून घेऊयात

प्रकल्पाचे फायदे :

• नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास

• प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य

• मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य

मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे १५ किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत होईल.

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये :

हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील १० व्या लांबीचा पाण्यावरील समुद्रावरील पूल ठरणार आहे.

ऑर्थोट्रोपिक स्टील डेक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथम वापर या सेतूच्या निर्मितीसाठी करण्यात येईल.

८५००० मे.टन ऑथोट्रॉपीक स्टीलचा वापर यात करणार येणार आहे. १,७०,००० मे. टन वजनाच्या स्टोलच्या सळयांचा प्रकल्पात वापर असणार आहे. ४८,००० किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसोंग वायर्सचा प्रकल्पात वापर केला जातो. तर ९,७५,००० घनमीटर कॉक्रीटचा प्रकल्पात वापर करण्यात येईल. ३५ किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचासुद्धा प्रकल्पात वापर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT