mumbai viral video rpf jawans save child and mother from going under train video goes viral hailed by users
mumbai viral video rpf jawans save child and mother from going under train video goes viral hailed by users  
Trending News

Viral Video: मुबईत RPF जवानांनी वाचवला माय-लेकराचा जीव, सर्वत्र होतय कौतुक

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेकदा अपघात होतात. मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकावर अशाच एका अपघातात रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांनी एका महिलेला आणि तिच्या मुलाला सुखरूप वाचवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रेल्वे स्थानकावरील गर्दी आणि प्रवाशांच्या धकाकबुक्कीमुळे एक महिला ट्रेनमधून पडली. मात्र रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वेळीच त्या दोघांना रेल्वेखाली जाण्यापासून वाचवले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक महिला आणि मुलांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा अपघात कसा घडला?

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आरपीएफच्या जवानांनी सतर्कता दाखवत एका महिलेला आणि तिच्या मुलाला मृत्यूपासून वाचवले. मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर एका महिलेने आपल्या मुलासह ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे एक महिला आणि तिचे मूल चालत्या ट्रेनमधून पडले. यादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी चपळाई दाखवत, आधी मुलाला ट्रेनपासून खेचले आणि नंतर ती महिला पडल्यावर तिला ट्रेनमधून दूर केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याआधीही आरपीएफ जवानांचे असे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात त्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात एक महिला लागून असलेल्या कल्याण स्थानकात घसरली होती आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली होती. प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावत असलेल्या आरपीएफ जवानाने महिलेला वेळीच बाहेर ओढून तिचे प्राण वाचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT