Viral VIdeo Sakal
Trending News

मुस्लीम डिलीव्हरी बॉयला हिंदुत्ववाद्यांकडून काठीने मारहाण? थरारक CCTV Footage Viral

ही घटना महाराष्ट्रातील नांदेड येथे घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड येथे एका डिलीव्हरी बॉयला काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा डिलीव्हरी बॉय मुस्लीम असल्याचा दावा केला जात असून हिंदुत्ववादी गुंडाकडून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक झोमॅटो डिलीव्हरी बॉय गाडीवर थांबलेला दिसत आहे. त्याच्या गाडीच्या टाकीवर फूड बॅग ठेवली असून समोरून तीन ते चार मुले येताना दिसत आहेत. मुले जवळ आल्यानंतर त्यांनी थेट मारायला सुरूवात केली. त्यानंतर एकाने डिलीव्हरी बॉयला काठीने मारहाण केली.

दरम्यान, नांदेड येथील बजरंग नगर येथे ही घटना घडल्याची माहिती असून अरमान असं मारहाण झालेल्या पीडित तरूणाचे नाव आहे. गुंडांनी त्याच्या दाढीला कलर लावत त्याच्या कपाळावर रंगाने टिळक लावल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

अरमान हा विधी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असून त्याचे वडील शेतकरी आहेत. कॉलेजसाठी आणि राहण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो डिलीव्हरी बॉयचं काम करत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT