Marriage Sakal
Trending News

Viral : लव्ह जिहादच्या चर्चा असतानाच मुस्लीम तरूणीने हिंदू तरूणासोबत घेतले सात फेरे

दोन समाजात सलोख्याचे संबंध टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.

दत्ता लवांडे

राज्यात सध्या हिंदू मुस्लीम वाद वाढत असतानाच एक दिलासादायक आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारी बातमी समोर आली आहे. धर्माच्या चौकटी मोडून एका मुस्लीम तरूणीने हिंदू तरूणाशी विवाह केला आहे. उत्तरप्रदेशमधील बहराईच येथील रूबीना आणि शेष कुमार अवस्थी असं विवाह केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.

अधिक माहितीनुसार, रूबीना ही तरूणी शेष कुमार अवस्थी या तरूणाच्या मागच्या अनेक दिवसांपासून प्रेमात होती. पण धर्म आडवा येत असल्यामुळे त्यांच्या प्रेमात अडथळा येत होता. लग्नासाठीसुद्धा तरूणीच्या कुटुंबियांकडून मोठा विरोध होत होता. त्यामुळे त्यांनी काही सहकाऱ्यांच्या साथीने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या प्रेमासाठी मुस्लीम असलेली रूबीना ही रूबी अवस्थी बनली. त्यांनी हिंदू रितीरिवाजानुसार मंदिरात सात फेरे घेऊन दोघांनी लग्न केलं आणि रूबीना हिने शेष कुमार याच्या नावाचं कुंकू भांगेत भरलं. पण या लग्नानंतर रूबीनाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी रूबीना हिला कोर्टात दाखल केले.

कोर्टात दाखल केल्यानंतर रूबीना म्हणाली की, "मी अज्ञान नाहीये, मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी माझ्या इच्छेनुसार हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे." रूबीनाने कोर्टासमोर दिलेल्या जबाबानंतर रूबीना हिला शेष कुमार यांच्या घरी सुरक्षेसहित पोहोच करण्यात आलं आहे.

"आम्ही मुस्लीम समुदायातील मुलगी सून म्हणून स्विकार करत आहोत. या लग्नानंतर आम्ही खूप खूश आहोत." असं शेष कुमार यांचे वडील म्हणाले. तर ही दोन्ही समाजासाठी दिलासादाय बातमी असून दोन समाजात सलोख्याचे संबंध टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT