Emergency Landing 
Trending News

Head Lice: बापरे! केसातील उवांमुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग; कुठे घडलाय हा विचित्र प्रकार? जाणून घ्या

प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबण्यासाठी एअरलाईननं खर्चही दिला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

न्यूयॉर्क : विविध कारणांमुळं विमानांची उड्डाणं रद्द झाल्याची किंवा इमर्जन्सी लँडिंग झाल्याचे प्रकार तुम्ही ऐकले असतील. पण कधी डोक्यातील उवांमुळं अशा प्रकारे एखाद्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याचं तुम्ही ऐकलं नसेलच. पण हा विचित्र प्रकार खरोखरच घडला आहे. विशेष म्हणजे अचानक विमान उतरवावं लागल्यानं एअरलाईन कंपनीनं आपल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्चही दिला.

काय घडलंय नेमकं?

विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या डोक्यात प्रचंड प्रमाणात उवा होत्या. या उवा अक्षरशः तिच्या केसातून खांद्यावर फिरत होत्या. हे दृश्य त्याच विमानातील दोन तरुणींनी पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती फ्लाईट अटेंडंटला दिली. त्यानंतर तिनं ही माहिती कॅप्टनपर्यंत पोहोचवली. यानंतर काही वेळातच विमान हे मध्येच एका विमानतळावर उतरवण्यात आलं. सुरुवातीला विमानाचं इमर्जन्सी लँडिंग का करण्यात आलं याचं कारण एअरलाईन कंपनीकडून प्रवाशांना दिलं गेलं नाही.

विमान लँड झाल्यानंतर ते तब्बल १२ तास याच विमानतळावर थांबवण्यात आलं. त्यामुळं वैतागलेल्या प्रवाशांनी अनेककदा विचारणा केल्यानंतर विमानाच्या क्रू मेंबर्सनी या महिला प्रवाशाला वैद्यकीय मदतीची गरज असल्यानं विमानाचं इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. खरंतर ही विद्यकीय मदत त्याच महिलेला डोक्यातील उवांबाबत असल्याचं स्पष्ट झालं. पण यामुळं अनेक प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

हॉटेलमध्ये राहण्याची केली सोय

दरम्यान, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विमान कंपनीनं प्रवाशांन हॉटेलवर थांबण्यासाठी हॉटेलचं व्हाऊचर आणि खर्चासाठी १२ डॉलर इतकी रक्कम देऊ केली. यासंदर्भातील ई-मेलही कंपनीनं प्रवाशांना केला.

नेमकी कुठे घडली घटना?

अमेरिकेत ही घटना घडली असून लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटचं फिनिक्समध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. प्रवाशी महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणावर उवा दिसून आल्यानं खरंतर हे इमर्जन्सी लँडिंग झालं होतं. याच वर्षी १५ जून रोजी ही घटना घडली होती. त्यानुसार, TikTok युजर इथान ज्युडेल्सन (Ethan Judelson) यानं एका व्हिडिओद्वारे दिली होती, ज्याला एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ज्युडेल्सनने व्हिडिओत म्हटलं की, "आम्ही अॅऱिझोनाच्या फिनिक्स विमानतळावर 12 तास होतो कारण आमच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं होतं. त्याचं कारण म्हणजे माझ्या शेजारी असलेल्या महिलेला उवांचा इतका भयानक त्रास होत होता. सुरुवातीला अमेरिकन एअरलाइन्सनं इमर्जन्सी लँडिंगसाठी विशिष्ट कारणे दिली नाहीत. मी आजूबाजूला पाहिला तर कोणीही विमानातून खाली उतरलं नव्हतं, कोणीही घाबरत नव्हतं. त्यामुळं मला असं वाटलं की मग इतकं भयंकर काय घडलंय.

पण विमानाच्या क्रू मेंबर्सनं आम्हाला लँडिंगनंतर अधिकची माहिती देऊ असं सांगितलं होतं. पण त्या महिलेच्या डोक्यातील उवांमुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याची चर्चा इतर प्रवाशांमध्ये सुरु होती. नंतर अमेरिकन एअरलाईन्सनं देखील या घटनेच्या कारणाला दुजोरा दिला. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की, एका प्रवाशाला वैद्यकीय मदत हवी असल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावा लागणार नाही का? जाणून घ्या नवा नियम

IPL 2026 : शुभमन गिलच्या संघातील स्टार खेळाडूची नको ती कृती, Viral Video ने अनेकांच्या भुवया उंचावल्या... वादाला फुटले तोंड

Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

लक्षणे नाहीत तरीही धोका मोठा! वयाच्या 45 नंतर ‘या’ कॅन्सरची तपासणी का गरजेची?

Latest Marathi News Live Update: अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मी आक्रमक

SCROLL FOR NEXT