Naatu Naatu Dance In Office With Boss Sakal
Trending News

Naatu Naatu Dance: 'नाटू नाटू'वर भन्नाट डान्स; ऑफिसमध्येच कर्मचाऱ्यांनी बॉसला लावलं कामाला

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Naatu Naatu Dance: दाक्षिणात्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर मिळवल्यानंतर सोशल मीडियावर या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

तर या गाण्यावर अनेक रील बनवण्यात आले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ऑफिसमध्ये एक बॉस आणि त्याचे कर्मचारी या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका ऑफिसमधील कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ नाटू नाटू या गाण्यावर डान्स करत आहेत. या गाण्यातील सगळ्या स्टेप्स फॉलो करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यामध्ये सहा कर्मचारी आणि एक बॉस असे सात लोकांचा सामावेश आहे. यामध्ये बॉस डान्स करताना लाजत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT