jeans sakal
Trending News

फाटकी अन् मळकी Jeans चक्क 62 लाख रुपयांना विकली, काय आहे 'या' जीन्समध्ये खास

Photo Viral: एक फाटकी अन् मळकी Jeans चक्क 62 लाख रुपयांना विकण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अगदी थक्क करणाऱ्या असतात. अशीच एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. एक फाटकी अन् मळकी Jeans चक्क 62 लाख रुपयांना विकण्यात आली. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. सध्या या जीन्सचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

62 लाख रुपयांना विकण्यात आलेल्या या जीन्समध्ये तुम्हाला वाटेल एवढं काय खास आहे? चला तर या विषयी जाणून घेऊया.

फाटकी अन् मळकी असलेली ही जिन्स तुम्ही टाकून द्याल पण ही जीन्स न्यू मेक्सिकोमध्ये 62 लाख रुपयांना विकण्यात आली. तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की जीन्स खुप जास्त जुनी आहे, मळकी आहे एवढंच काय तर फाटकी आहे. ओल्ड फॅशन असलेल्या लेव्हिस कंपनीच्या या जीन्सचा लिलाव झालाय. लिलावतात डिओगोच्या एका क्लोथिंग डिलरने डेनिम डॉक्टर्सचे मालक जीप स्वीवनसनसोबत मिळून ही जीन्स विकत घेतली.

या जीन्समध्ये काय खास आहे?

ही जीन्स खुप जुनी आहे.  1880 सालातील ही जीन्स आहे. ही जीन्स आतापर्यंत असणे ही खुप हटके बाब आहे. त्यानंतर अगदी काही वर्षापूर्वी जुन्या खाणीत ही जीन्स सापडली होती. तिथे काम करणाऱ्या एका मजुराने ही जीन्स आपल्याकडे ठेवून घेतली होती. या जीन्सचे डिझाईन खुप हटके आणि जुन्या फॅशनचे आहे.

सध्या सोशल मीडियावर या जीन्सचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT