Viral Video Sakal
Trending News

बेताची परिस्थिती, शरीर थकले तरी आजीला जीव लावणारे आजोबा | Relation

शर्मिला वाळुंज

मरेपर्यंत साथ देणे काय असतं हो? आपण आपल्या प्रेयसीला किंवा बायकोला मरेपर्यंत साथ देऊ असं सांगतो किंवा सात जन्माची साथ देण्यासाठी लग्नात सात फेरे घेतो पण ते नातं खरंच शेवटपर्यंत जातं का? अनेक लोकांचे नाते मध्येत तुटत असतात. जोडीदार दुरावत जातात. मरेपर्यंत साथ देणारे खूप कमी लोकं असतात. अशीच आपल्या जोडीदाराला साथ देणाऱ्या आजोबांची ही कहाणी...

हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत... वयोमानानुसार शरीर थकले... भिक्षा मागून मिळेल त्यावर होणारी गुजराण... त्याही कठीण परिस्थितीत आपल्या जोडीदाराची काळजी घेत तिला जेवणाचा घास भरविणाऱ्या आजोबांना पाहून उपस्थितांचे मन हेलावले. भर दुपारी रणरणत्या उन्हात हे आजी आजोबा खिडकाळेश्वर मंदिर बाहेर भिक्षा मागत बसले होते.

दुपारची वेळ पत्नीला भूक लागली असेल म्हणून भक्तांकडून मिळालेले अन्न ते प्रेमाने पत्नीला भरवत होते. हे पाहून उपस्थितांचे मन हेलावले. अनेकांनी बाबांना भिक्षा देत मदत केली. महाशिवरात्रीला मंदिरात प्रत्येक भाविक मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन शिवाचे दर्शन घेत होता. मात्र मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना मनुष्यरूपी शिव पार्वतीचे दर्शन घडत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT