Online Shopping esakal
Trending News

Online Shopping : ऑनलाईन विकलं जातंय भूत शोधण्याचं मशीन; काय आहे प्रकरण?

हे डिव्हाईस सध्या २ ते ५ हजार रुपयांपर्यंत विकलं जात आहे.

वैष्णवी कारंजकर

बहुतेक लोक भूत आणि आत्म्यांना अंधश्रद्धा मानतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र आता भूत पकडण्याचा दावा करणारं एक डिव्हाईस बाजारात आलं आहे. हे डिव्हाइस Amazon वर उपलब्ध आहे आणि बरेचजण खरेदीही करतायत.

हे डिव्हाईस काय आहे, नक्की त्याचा वापर कशासाठी केला जातो? तर बाजारात जे डिव्हाईस सध्या घोस्ट डिटेक्टर म्हणून विकलं जातंय ते खरंतर EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर यंत्र आहे. जिथं प्रभावी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे, ते शोधून काढण्यासाठी हे डिव्हाईस वापरलं जातं.

अनेक व्यवसायांमध्येही त्याचा वापर केला जातो. या डिव्हाईसला EMF डिटेक्टर असंच म्हणतात. पण सध्या ते विकलं जावं, या हेतूने त्याला घोस्ट डिटेक्टर म्हणून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर टाकलं असल्याची चर्चा आहे.

भूतांचा काय संबंध?

असं म्हटलं जातं की जिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आहे, तिथे भूत असू शकतात. अर्थात हा केवळ एक समज आहे, ज्याचा अधिकृत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मात्र पॅरानॉर्मल तज्ज्ञ बऱ्याचदा हे डिव्हाईस वापरतात. म्हणूनच याला घोस्ट डिटेक्टर म्हटलं जात असल्याचं वृत्त झी न्यूजने दिलं आहे. Amazon वर हे डिव्हाईस दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत विकलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Mobile Price Hike : 10 हजारांचा स्मार्टफोन आता 20 हजारला? मोबाईल कंपन्यांचा 'तो' सिक्रेट खेळ, जो हळू हळू रिकामा करतोय तुमचा खिसा

Bakri Eid: बकऱ्याचा अजब 'डाएट प्लॅन'! रोज २५० ग्रॅम चिकन आणि कोल्ड्रिंक; AC त राहणाऱ्या काश्मिरी बकऱ्याची गोष्ट

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

SCROLL FOR NEXT