paan dosa
paan dosa sakal
Trending News

Paan Dosa: मसाला डोसा खाल्ला आता पान डोसा ट्राय करा! अनोख्या फूड कॉम्बिनेशनचा व्हायरल व्हिडिओ

Aishwarya Musale

आत्तापर्यंत तुम्ही फ्रूट टी, गुलाब जामुन पराठा, दही गुलाब जामुन, रसगुल्ला रोल आणि ओरिओ बिस्किट ऑम्लेट इत्यादींबद्दल ऐकले असेलच. आजकाल खाद्यपदार्थांवर प्रयोग करणे नवीन नाही.

तुम्ही याआधी अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये पाणीपुरीमध्ये पाणी न घालण्याऐवजी कोल्ड ड्रिंक्स दिले जाते. पण आता या यादीत आणखी एक नवीन फूड कॉम्बिनेशन 'पान डोसा' देखील जोडले गेले आहे.

या डोसाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विश्वास बसत नाही का? चला, आज आम्ही तुम्हाला या अजब डोस्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ दाखवतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पान डोसा बनवला जात आहे

हॅप्पी नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की एक माणूस प्रथम हिरव्या रंगाचा डोसा गरम तव्यावर पसरवतो. नंतर त्यावर लोणी, पान मिश्रण, खजूर, अंजीर, टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट्स टाकतो. त्यानंतर जाड पेस्ट बनवण्यासाठी तो सर्व साहित्य मिक्स करतो.

व्हिडिओसोबत मजेदार कॅप्शन दिले आहे

2 दिवसांपूर्वी शेअर केल्यापासून व्हिडिओला 1.4 लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत आणि 'पान डोसा, हा ग्रह सोडण्याची वेळ आली आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.या व्हायरल व्हिडीओने अनेक यूजर्सला धक्का बसला असून लोक अशा विचित्र कॉम्बिनेशनवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT