Cat Attack Sakal
Trending News

Viral : मांजर पाळताय? सावधान! आधी मालकावर हल्ला करणाऱ्या मांजराचा 'हा' Video पाहा

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतील. कुत्रे, मांजर, ससे तर परदेशात वाघ, सिंह, हरिण जंगली प्राणी सुद्धा पाळण्यास परवानगी आहे. काहीजण पाळीव प्राण्यांना खूप जीव लावतात. तर काहीजण कुत्र्यांना घरातली कामं शिकवत असतात. पण काहीवेळा पाळीव प्राण्याने आपल्याच मालकावर हल्ला केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक मांजर आपल्याच मालकावर जबर हल्ला करताना दिसत आहे. @Craxyclipsonly या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून पतीपत्नी घरात काम करत असताना मांजर व्यक्तीवर अचानक हल्ला करताना दिसत आहे.

मांजराने हल्ला केल्यानंतर सदर व्यक्ती सुरूवातील आश्चर्यचकित होतो. पण नंतर तो मांजरापासून बचावण्यासाठी प्रयत्न करू लागतो. सदर व्यक्तीची पत्नीसुद्धा त्याला मांजराच्या हल्ल्यातून थांबवण्यासाठी प्रयत्न करते. पण शेवटी हे चिडलेले मांजर आपला हल्ला थांबवत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, काहीव पाळीव प्राणी अचानक आपल्याच मालकावर हल्ला करत असतात. कुत्र्याने आपल्याच मालकावर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर पाळीव प्राण्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे प्राणी पाळताना काळजी घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT