PM Modi US Visit congress slam PM Modi over use of dairy and teleprompter to address in us joe biden watch video  
Trending News

Video : टेलिप्रॉम्पटर मिळाला नाही म्हणून डायरी काढली अन् केली फेकायला सुरवात; काँग्रेसने उडवली खिल्ली

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी जो बायडन यांच्यासोबत बैठक घेतली ज्यामध्ये अनेक करांरांवर स्वक्षऱ्या करण्यात आल्या. यानंतर पीएम मोदी आणि जो बायडन यांनी माध्यमांच्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली.

मोदींनी यूएस खासदारांना देखील संबोधित केले. मात्र यादरम्यान पीएम मोदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान काँग्रेसकडून पीएम मोदींच्या टेलिप्रॉम्पटरवर जोरदार टीका केली जात आहे.

काँग्रेसचे भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनीवास बीव्ही यांनी पीएम मोदी यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डायरीत पाहून जो बायडेन याच्याशी बोलताना दिसत आहेत.

यावरून काँग्रेकडून टीका करण्यात आली आहे. "तथाकथित 'विश्वगुरू' , प्रसिद्ध ५६ इंच वक्त्याला ओव्हल ऑफिसमध्ये टेलिप्रॉम्पटर मिळालं नाही म्हणून डायरी उघडून फेकायला सुरूवात केली.." असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. तसेच मोदींच्या जीवनात टेलीप्रॉम्टर नसता तर तर काय झालं असतं असा खोचक सवाल देखील विचारला आहे.

पीएम मोदी आणि बायडन यांच्याकडून एकत्रित निवेदन दिले जात होते तेव्हा पीएम मोदींच्या हातात डायरी होती. यावरू पंतप्रधान मोदी यांच्यावर नेटकऱ्यांकडून देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांनी माध्यमांच्या प्रश्नांना देखील यावेळी उत्तरे दिली. यादरम्यान मोदींच्या समोर टेलिप्रॉम्पटर लावण्यात आले होते. पत्रकार परिषदेत देखील टेलिप्रॉम्पटर वापरल्याने सोशल मीडियीवर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

यादरम्यान माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी देखील याबद्दल ट्वीट केलं आहे. "९ वर्षांनंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतह टेलिप्रॉम्पटर? एकतर कोणीत्री रिपोटच्या मदतीने ऑन द स्पॉट उत्तरं लिहीत होतं किवा विचारण्यात आलेले प्रश्न आधीच मागिती होते. बायडन काय विचर करत असतील?" असं ट्वीट केल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT