Bribe Video Sakal
Trending News

ऑन कॅमेरा पोलीस इन्स्पेक्टरने घेतली लाच; Video होतोय Viral | Bribe Video

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेश येथील जौनपूर येथे एका पोलीस अधिकाऱ्याने ऑन कॅमेरा लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेनंतर सदर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथील बदलापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा प्रकार घडला असून तेथे तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने हा पराक्रम केला आहे. एक प्रकरण मिटवण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून लाच घेतली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आणि आरोपी पोलीस उपनिरिक्षक पत्र्याच्या खोलीत बसलेले असून व्यक्ती त्याला काही पैसे मोजून देताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसही ते पैसे घेऊन खिशात घालताना दिसत आहे. त्याच्या शेजारी बसलेला व्यक्ती घाबरलेला दिसत आहे.

ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं की, बदलापूर येथील ठाण्यावर तैनात असलेल्या उपनिरिक्षक प्रसिद्ध नारायण सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉक्टर अजय पाल शर्मा यांनी उपनिरीक्षक प्रसिद्ध नारायण सिंह यांना निलंबित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT