Viral video Esakal
Trending News

Viral video: काय सांगता! आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची जीप थेट हॉस्पिटलमध्ये; काय होता त्याचा गुन्हा?

Police jeep enters Hospital Ward: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आपली जीप थेट AIIMS च्या आपात्कालीन वॉर्डमध्ये आणल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

२६ सेकंदाची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऋषिकेशच्या एआयआयएमएस हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस आपली जीप घेऊन थेट चौथ्या मजल्यावर गेले होते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, बेडवर रुग्ण झोपलेले आहेत. अशा स्थितीत जीप त्याठिकाणी घेऊन जाणे योग्य होते का? असा प्रश्न विचारला जात आहे.

जीप आपात्कालीन वॉर्डमध्ये आलेली दिसते. त्यावेळी सुरक्षा गार्ड SUV जीपला जागा करुन देताना जिसत आहे. रुग्णांसह स्ट्रेचर बाजूला सारले जात असल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, रिलेशन ऑफिसर संदीप कुमार सिंह यांनी सांगितलं की, पोलीस जीप कधी हॉस्पिटलमध्ये आली याबाबच अद्याप माहिती नाही. पूर्ण चौकशीनंतर याबाबत माहिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, AIIMS च्या नर्सिंग ऑफिसरला ताब्यात घेण्यात आले आहे. एका ज्यूनियर स्थानिक डॉक्टरने कर्तव्यावर असताना नर्सिंग ऑफिसरने विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्याने महिला डॉक्टरला आक्षेपार्ह स्पर्श केला, त्यानंतर त्याने माफी मागण्यासाठी मेसेज देखील केल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांची जीप जेव्हा थेट हॉस्पिटलमध्ये घुसवली गेली तेव्हा अनेकांनी याकडे आश्चर्याने पाहिलं.

महिला डॉक्टरने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी हॉस्पिटलमध्ये अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. शिवाय नर्सिंग ऑफिसरला निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी हॉस्पिटलबाहेर आंदोलन देखील झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

Prakash Ambedkar : संविधान अन् युद्धाचे संकट टाळण्यासाठी भाजपला हरवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

SCROLL FOR NEXT