Porsche Car Viral Video Esakal
Trending News

Viral Video: दिलदार मालक! कारचे गुपचूप फोटो काढणाऱ्या दिव्यांगाला पोर्शेतून फिरवले; व्हिडिओ पाहून फुलेल तुमचाही चेहरा

Delhi Porsche Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती एका लक्झरी कारच्या शेजारी पोज देताना आणि सेल्फी काढताना दिसत आहे.

आशुतोष मसगौंडे

एका दिव्यांग व्यक्तीला लक्झरी कारच्या मालकाने त्याच्या पार्क केलेल्या पोर्शसह फोटो काढताना पकडले. जेव्हा मालक आपली कार सुरू करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आला तेव्हा त्याला एक व्यक्ती वाहनाच्या बोनेटला टेकून सेल्फी काढताना दिसली.

यानंतर कार मालकाने त्या दिव्यांग व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करताच तो कारपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती एका लक्झरी कारच्या शेजारी पोज देताना आणि सेल्फी काढताना दिसत आहे. हे सर्व सुरू असताना कारचा मालक तेथे आला. कारचा मालक आल्याचे लक्षात येताच तो दिव्यांग व्यक्ती कारपासून दूर पळू लागाला. मात्र कार मालकाने जवळ जाऊन त्या दिव्यांग व्यक्तीला पकडले आणि त्याला त्याच्या पोर्शमध्ये फिरण्याची ऑफर दिली.

यानंतर कारच्या मालकाने या दिव्यांग व्यक्तील त्याच्या पोर्शे कारमध्ये बसवत अनेक फोटो काढले. याचबरोबर त्याला कारमधून फिरवूनही आणले. यानंतर या दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद मावेना झाला होता.

दरम्यान दिव्यांग व्यक्तीने कारबरोबर फोटो काढल्याचे पाहिल्यानंतर पिवळ्या पोर्शचा मालक त्याच्यापाशी गेला आणि त्याने काढलेले सेल्फी पाहिले. यानंतर मालकाने दिव्यांगाला आणखी काही फोटो काढायचे आहेत का असे विचारले. यानंतर कार मालकाने दिव्यांगाला गाडीत बसवले त्याचे फोटे काढले आणि त्याला गाडीतून फेरफटाकाहू मारून आणला.

दरम्यान पोर्शे कारच्या मालकाने ऑगस्टच्या सुरूवातीला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तो सध्या तुफान व्हायरल होत आहे. याला 13 दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 320 अंकांनी खाली; तर Nifty 25,250 अंकांवर; कोणते शेअर्स घसरले?

Gold Rate Today : रेकॉर्डब्रेक! सोन्यात अवघ्या 12 तासांत 5 हजारांची वाढ; चांदी तर त्याहून सुसाट; पाहा आजचा भाव

Nashik Tapovan News : नियमांशिवाय एकही झाड तोडू नका! नाशिक महापालिकेला पुन्हा जोरदार झटका; तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

Viral Video: अडीच लाखांची साडी अन् पहाटे 4 वाजल्यापासून रांग! महिलांची क्रेझ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये ड्रग्सविरोधी मोठी कारवाई; ३ किलो एमडी पावडर जप्त

SCROLL FOR NEXT