Rajasthan News esakal
Trending News

VIDEO : नातेवाईकांसमोर झाली नाचक्की, पठ्ठ्यानं लढवली अनोखी शक्कल; कार गाढवानं खेचत सर्व्हिस सेंटरला नेली

साखरपुड्यासाठी तो सासुरवाडीला पोहचला, तेव्हाच नेमकी त्याची कार खराब झाली.

सकाळ डिजिटल टीम

क्रेटा कारचे दुसरे टॉप मॉडेल सुमारे 18.50 लाख रुपयांना विकत घेतले होते. परंतु, कार खरेदी केल्यानंतर एक ते दीड महिन्यातच समस्या सुरू झाली.

Rajasthan News : राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका तरुणानं कार खरेदी केली. मात्र, ही कार दीड महिन्यातच बिघडली. कार बिघडल्यामुळं हा तरुण खूप वैतागला. साखरपुड्यासाठी तो सासुरवाडीला पोहचला, तेव्हाच नेमकी त्याची कार खराब झाली.

त्यानं कंपनीत दुरुस्तीसाठी कार घेऊन जाण्यासाठी फोन केला. मात्र, कंपनीनं काही फारसं लक्ष दिलं नाही. त्यानंतर या तरुणानं चक्क आपली कार गाढवाकडून खेचत शोरुममध्ये पोहचवली. याचा व्हिडिओ समोर आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरच्या सुंदरवास इथं राहणारे राजकुमार पुरबिया यांनी क्रेटा कार खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर दीड महिन्यातच त्यात बिघाड निर्माण झाली. एके दिवशी राजकुमार आपल्या साखरपुड्यासाठी गेला असताना तिथंही कारमध्ये खराबी जाणवली. राजकुमार यांनी कंपनीला याबाबत फोन करून माहिती दिली आणि गाडी घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र, कंपनीनं गाडी तात्काळ घटनास्थळावरून नेण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळं राजकुमार यांना राग अनावर झाला.

शोरूम व्यवस्थापनाचा निषेध

कार शोरूम व्यवस्थापनाच्या या वागण्यामुळं कार मालक इतके संतापले की, त्यांनी निषेध करण्याचा अनोखा मार्ग निवडला. राजकुमार यांनी आपली नवीन गाडी चक्क गाढवाकडून खेचत शोरुममध्ये पोहचवली आणि कंपनीच्या शोरूमचा आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा निषेध केला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला आहे.

18.50 लाखांना खरेदी केली 'क्रेटा'

कार मालक राजकुमार सांगतात, क्रेटा कारचे दुसरे टॉप मॉडेल सुमारे 18.50 लाख रुपयांना विकत घेतले होते. परंतु, कार खरेदी केल्यानंतर एक ते दीड महिन्यातच समस्या सुरू झाली. माझ्या साखरपुड्यासाठी गाडी नेली होती, परंतु तिथंही बिघाड निर्माण झाली. त्यानंतर कंपनीला फोन करून गाडी घेण्यास सांगितलं. मात्र, कंपनीनं सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत गाडी घेण्यास असमर्थता दर्शवल्याचं राजकुमार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT