Girlfriend On Rent  Sakal
Trending News

Girlfriend On Rent : सिंगल आहात? इथे मिळते भाड्याने गर्लफ्रेंड; जाणून घ्या

पैसे द्या आणि गर्लफ्रेंड भाड्याने घ्या... अशी असते ऑफर

सकाळ डिजिटल टीम

अनेक वस्तू भाड्याने मिळतात हे आपल्याला माहिती असेल पण गर्लफ्रेंड भाड्याने मिळण्याचा प्रकार आपण पहिल्यांदाच ऐकत असाल. सध्या गर्लफ्रेंड भाड्याने देण्याचा व्यवसाय चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. साऊथ चायना मॉर्निंग रिपोर्टनुसार हा व्यवसाय चीनमध्ये केला जातो. या व्यवसायात मुली आपल्या इच्छेनुसार कमाई करत असतात.

साऊथ चायना मॉर्निंग रिपोर्टनुसार, अनेक नोकरी करणाऱ्या मुलीसुद्धा सुट्टीच्या दिवशी हा व्यवसाय करत असतात. अशा मुलींना सध्या मार्केटमध्ये चांगलीच मागणी असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यासाठी 89y.con अशी वेबसाईट बनवण्यात आली आहे. सण उत्सव, सुट्टीच्या दिवसांत या मुलींची मागणी वाढून त्यांचा दरही वाढतो.

दरम्यान, सुट्टीच्या दिवशी या मुली ३६० डॉलर म्हणजे ३० हजारांपेक्षा जास्त किंमत घेतात. एवढंच नाही तर या मुली एका दिवसांत ४ ते ५ ग्राहकांना सर्विस देत असतात. त्यामुळे या काळात एकदोन आठवड्यामध्येच त्यांची कमाई पाच लाखांपर्यंत जाते. पण यासाठी एवढी मोठी रक्कम आकारण्याचे काय कारण असेल असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल.

या मुली एवढी रक्कम का आकारतात?

चीनमध्ये तरूणांचे लग्नाविषयी वेगळे मत आहे. तिथे मुलं लग्न करणं टाळत असतात. तर त्यांच्या आईवडीलांकडून त्यांना लग्नासाठी दबाव टाकला जातो. अशी मुले आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी या मुलींना घेऊन जातात. त्यामुळे आईवडीलांना वाटते की, आपल्या मुलाला गर्लफ्रेंड आहे.

त्याचबरोबर नकली मॅरिज सर्टिफिकेट बनवण्यासाठीसुद्धा या मुली भाड्याने घेतल्या जातात. लग्नाचे फोटो काढण्यासाठीसुद्धा या मुलींचा वापर केला जातो म्हणून या मुली जास्त रक्कम आकारतात अशी माहिती साऊथ चायना मॉर्निंग रिपोर्टनुसार समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT