Viral video  Sakal
Trending News

पर्यटकांच्या गाडीवर गेंड्याचा हल्ला; जीप कोसळली दरीत, थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

पर्यटकांनी आक्रमक जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून सावध राहिले पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी जंगल सफारीला गेलात? जंगल सफारीला गेल्यावर जंगली प्राण्यांचे दर्शन व्हावे अशी सर्वांची इच्छा असते पण काही जंगली प्राणी पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे पर्यटकांनी सावध राहायला पाहिजे. सध्या जंगली गेंड्याने पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली असून त्यामध्ये पर्यटकांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पर्यटकांच्या दोन गाड्या आणि दुचाकीवर एक वन कर्मचारी उभा असल्याचं दिसत आहे. काही क्षणामध्ये झाडातून दोन गेंडे बाहेर येतात आणि पर्यटकांच्या गाडीकडे हल्ला करण्यासाठी धावत सुटतात. त्यानंतर पुढचे वाहन मागे घेण्याचा प्रयत्न चालक करतो.

गेंड्याचा वेग जास्त असल्यामुळे पुढचे वाहन वेगात मागे घेण्याचा प्रयत्न सदर चालकाने केला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दरीत हे वाहन कोसळले. या अपघातात गाडीमध्ये असलेले सात पर्यटक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानात घडली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT