Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : मानलं सर जी! रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला रूग्णाला उचलून नेत केली मदत

हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांचा आत्मा म्हणता येईल. दररोज करोडो लोकं लोकलमधून प्रवास करत असतात. पण या प्रवासात रोज कित्येक घटना घडतात. काही वाईट, दुर्दैवी तर काही माणुसकी दाखवणाऱ्या असतात. सध्या असाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बोरिवली रेल्वे स्टेशनवरील आहे. तिथे एका आजारी महिलेला पोलीस अधिकारी उचलून रेल्वेच्या डब्याजवळ नेताना दिसत आहे. आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक मान सिंग असं त्यांचं नाव असून व्हील चेअर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी थेट महिलेला आपल्या हाताने उचलून दुसऱ्या डब्यापर्यंत नेले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक केलं असून या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT